देवमाणूस समारोपाकडे
देवमाणूस ही झी मराठीवरील मालिका एका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. गेली कित्येक महिने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या ह्या मालिकेचा शेवट कसा होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्य घटनेवर आधारित ही मालिका काहीशी भरकटत चाललेली असल्यामुळे मालिकेच्या काही अवास्तव भागांमुळे तिच्यावर बरीचशी टिकादेखील झाली. मात्र लवकरच या मालिकेतील बोगस डॉक्टरचा पर्दापाश होऊन हा डॉक्टर दिव्या सिंगच्या ताब्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिव्याला डॉक्टरविरोधात बरेचसे पुरावे मिळाले असल्याने डॉक्टरच खरा देवीसिंग आहे आणि गावात घडणाऱ्या घटनांमागे त्याचाच हात आहे हे आता तिच्या लक्षात आले आहे. देवमाणूस मालिकेत एकीकडे दिव्या सिंगचा सुरू असलेला तपास तर दुसरीकडे डिंपल आणि डॉक्टर अजितच्या लग्नाची लगबग या दोन्ही गोष्टी वेग घेताना दिसत आहेत. डिंपल आणि डॉक्टरच्या या लग्नाच्या सोहळ्यातच दिव्या सिंग डॉक्टरला अटक होणार असल्याचे प्रोमोद्वारे लक्षात येत आहे. त्यामुळे मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे आता स्पष्ट झाले आहे. एवढे दिवस मालिकेतील सरू आज्जी, टोण्या, डिंपल ,बज्या, नाम्या, या सर्वांच्या अ...