जागतिक तंबाखू विरोधी दिन
जागतिक तंबाखू विरोधी दिन ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा होत आहे. व्यसन कुठलेही असो, ते घातकच. मात्र तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे वाढते सेवन आज चिंतनाचा विषय आहे. आपल्या सभोवताली वावरणाऱ्या अनेक लोकांना तंबाखू, सिगरेट, मावा यासारख्या आरोग्याला अपायकारक गोष्टींचे व्यसन असल्याचे आपणास दिसून येते. धुम्रपान हा अत्यंत गंभीर विषय असून महाविदयालयीन तरुणांमध्ये त्याचे वाढते प्रमाण चिंतेची बाब आहे. धुम्रपान हे मुख्यत्वे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांशी निगडीत आहे. या पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्याला जागोजागी दिसून येतात. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थांचे धुम्रपान करणा-या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पदार्थांच्या विक्री व सेवनावर अनेक निर्बंध आणुनदेखील अनेक ठिकाणी त्यांची विक्री खुलेआम होताना दिसते. तंबाखू सेवनाने भारतात साधारणतः १० लक्ष लोक विविध आजारांनी मृत्यू पावत आहेत. महाराष्ट्रामध्ये साधारणतः ३६ टक्के पुरुष व ५ टक्के महिला तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थांचा वापर ...