देशमुख काका एपीएमसीतुन सेवानिवृत्त
हसतमुख, हसवणारे, मेव्हणे व पाहुण्यांना सांभाळणारे देशमुख काका वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अनंत बाळकृष्ण देशमुख (देशमुख काका) हे बाजार समितीतील ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ मे २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले. सतत हसतमुख, हसवणारे व मदतीला सदैव धावून येणारे देशमुख काका आमचे अत्यंत जवळचे कौटुंबिक स्नेही. माझे वडील आणि देशमुख काका दोघेही एपीएमसीमध्ये नोकरीला होते. ऐरोलीला शाळेत असताना आम्ही एकाच रो हाऊसमध्ये राहायचो. त्यामुळे वडील शनिवार रविवारी गावी गेल्यावर मी त्यांच्याकडेच असायचो. नेहमी इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशमुख काकांना कधी टेन्शनमध्ये असलेले मी पाहिले नाही. उलट एखाद्या अडचणीच्या प्रसंगी ते धीर देतात, अगदीच मूडमध्ये असतील तर त्यांच्या आवडीचे पोवाडे, गाणी ऐकवतात. कौटुंबिक व आप्तेष्टांमध्येदेखील ते सर्वांना प्रिय आहेत. प्रत्येक कौटुंबिक कार्यक्रमामध्ये आवर्जून हजेरी लावणारे काका त्या कार्यक्रमाचा भाग कधी होऊन जातात कळतही नाही. अगदी घरातलाच कार्यक्रम असल्यासारखे ते प्रत्येक कामात हातभार लावत असतात. ऐरोलीनंतर घणसोलीला राहायला आल्यावरही आम्ही...