Posts

Showing posts from August, 2021

उत्सव परंपरा हीच महाराष्ट्राची ओळख

Image
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच अंशी नियंत्रणात आल्याने यंदा दहीहंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी देण्याची मागणी गोविंदा पथके आणि दहीहंडी आयोजकांनी सरकारकडे केली होती. गेल्या वर्षी काही गणेशोत्सव मंडळांनी करोना नियम पाळून उत्सवाची परंपरा कायम ठेवली होती. त्याच पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी दहीहंडी पथकांची होती. वास्तविक कोरोना इतक्यात समाजातून पूर्णतः नाहीसा होणे अशक्य आहे. त्यामुळे कोरोनाच्या भीतीने सर्व व्यवहार, कार्यक्रम, उत्सव बंद ठेवण्याचे दिवस आता उलटले आहेत. लोकांना प्रतिबंधाची बऱ्यापैकी समज आलेली आहे. आरोग्य विभागदेखील तिसऱ्या लाटेची परिस्थिती उद्भवली तर ती हाताळण्यास सुसज्ज आहे. त्यामुळे हळूहळू सणांवरील निर्बंध उठवण्याची वेळ आलेली आहे. कोविड लसीचे दोन डोस घेतलेल्या गोविंदांना आणि कमी उंचीच्या दहीहंडीला परवानगी देण्यास हरकत नव्हती. कोरोनाबद्दल खबरदारी व काळजी घेण्यास जी गोविंदा पथके, मंडळे तयार आहेत, त्यांना गर्दी न करता आपल्या विभागात पारंपरिक पद्धतीने व कमी उंचीच्या दहीहंडीला परवानगी द्यायला हवी. उत्सवावर पूर्...

डॉक्टर व पेशंट सुसंवाद आवश्यक

Image
डॉक्टर ह्या नावाबद्दल समाजात प्रचंड आदर असतो. डॉक्टर हा आजारातून बरे करणारा, जीव वाचवणारा व रुग्णाची काळजी घेणारा असल्यामुळे कुटुंबासाठी तो एक प्रकारचा वरदानच ठरतो. निरनिराळे आजार व त्यावरील आधुनिक संशोधन यामुळे वैद्यकीय क्षेत्र फार झपाट्याने बदलू लागले आहे. मात्र या बदलांबरोबरच आजारपण किंवा डॉक्टरी इलाजातील खर्चातदेखील मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळेच आजच्या बदलत्या काळात डॉक्टर व पेशंट यांच्यातील दरी दिवसेंदिवस रुंदावत आहे. सुसंवादाचा आभाव तसेच विविध कारणांतून निर्माण झालेले गैरसमज हे त्यामागील एक प्रमुख कारण आहे. जीवनदान देणारा डॉक्टर कोणत्याही रुग्णाला देवापेक्षा अधिक जवळचा असतोच. मात्र महागड्या वैद्यकीय सेवांमुळे पेशंट व त्यांचे नातेवाइक अस्वस्थ आहेत. आजारातून कायमस्वरुपी मुक्त तर व्हायचे आहे; पण त्यासाठी पैसे कसे उभे करायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. वैद्यकीय जगतातील बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या महागड्या सुविधा आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या पेशंटपर्यंत पोचविण्याची धडपड डॉक्टर मंडळींकडून केली जाते. यासाठी पेशंटचे समुपदेशन करण्यापासून शक्य तितकी मद...

राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा

Image
२५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा राबवण्यात येत आहे. माणूस आपल्याला मिळालेल्या अवयवांची विशेष काळजी घेत असतो. कान, नाक, डोळे, हात, पाय ही नीटनेटकी व व्यवस्थित असतील तर मनुष्य आयुष्यात कितीही मोठया संकटाला सामोरे जाऊ शकतो. त्यामुळे हे अवयव जपण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असतो. मात्र समाजात आज एक किंवा अधिक अवयव नसणारे लोकदेखील मोठ्या प्रमाणावर आहेत हेदेखील विसरून चालणार नाही. त्यातूनच अवयवदानाची संकल्पना वैद्यकीय क्षेत्रात दृढ झाली. आज अवयवदानाने अनेक लोकांना नवसंजीवनी मिळाल्याची अनेक उदाहरणे देता येतील. आपल्या सर्व अवयवांमध्ये अत्यंत महत्वाचा व संवेदनशील अवयव म्हणजे आपले डोळे. डोळे ही सजीवांना त्यातही मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी मानली जाते. मात्र, सर्वांनाच ही देणगी मिळालेली नाही. जन्मजात आंधळे असणे किंवा अपघाताने अंधत्व येणे यामुळे अशा व्यक्ती सृष्टीच्या सौंदर्याचा लाभ घेऊ शकत नाहीत. मात्र, आज विज्ञानाने केलेल्या प्रगतीच्या आधारे आपण एका व्यक्तीची दृष्टी दुसर्‍या एका अंध व्यक्तीला देऊन त्याचे जीवन प्रकाशित करू शकतो. नेत्रदानाच्या माध्...

अमेरिकेची संदिग्धवस्था जबाबदार

Image
अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थिती अत्यंत भयावह बनत चालली आहे. लोकांना सुरक्षेची हमी नसल्याने मिळेल त्या मार्गाने नागरिकांना देशातून म्हणजेच तालिबान्यांच्या तावडीतून बाहेर पडायचे आहे. रस्त्यांवर व विमानतळावर विमानांच्या अवतीभोवती लोकांनी गर्दी केल्याचे व अशातच विमानाला लटकून प्रवास करण्याच्या प्रयत्नात हवेतून खाली पडून काही जणांचा मृत्यू झाल्याचे कधीही न पाहिलेले व्हिडिओदेखील समोर आले आहेत. तालिबानने काबुलवर कब्जा मिळवताच अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडून पलायन केले. तालिबानच्या दहशतवादी संघटनेनं अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनवर पूर्ण कब्जा मिळवला आहे. वास्तविक अफगाणिस्तान अनेक वर्षांपासून अमेरिकी सैन्याच्या नियंत्रणात होता. अमेरिकेने येथील यंत्रणा सक्षम करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च गेल्या अनेक वर्षांत केला मात्र ऐनवेळी अमेरिकेने आपले सैन्य अफगानमधून हलवण्यास सुरुवात केल्याने तालिबानला विरोध मावळला व त्यांचा अफगाणिस्तानातील मार्ग मोकळा झाला. त्यामुळे अमेरिकेचे दुटप्पी धोरण अराजकतेला कारणीभूत आहे. त्यामुळे हा अमेरिकेचा सपशेल प...

चीड आणणारी उत्कंठा

Image
झी मराठीवरील देवमाणूस ही मालिका अखेरच्या भागात आणखी दोन महिलांचा खून करून अर्धवट अवस्थेत संपवण्यात आली व शेवट पाहण्यासाठी मालिकेचा येऊ घातलेला पुढील सिझन पाहावा लागणार असल्याचे सूतोवाच केले गेले. प्रसिद्धीच्या शिखरावर असलेली ही मालिका देवमाणूस ह्या खुनी पात्राच्या करामतींनी कमालीची रंगवण्यात आली होती. सत्यघटनेवर आधारित ही मालिका सत्यकथानकापासून पूर्णपणे भरकटली व लेखक दिग्दर्शकांना वाटेल तशी दाखवण्यात आली. त्यामुळे या मालिकेवर टिकादेखील खूप झाली. मालिकेच्या शेवटी तरी बोगस डॉक्टरचा पर्दाफाश होईल व त्याला मोठी शिक्षा होईल ही दर्शकांची अपेक्षादेखील फोल ठरली. एका खेडेगावमध्ये डझनभर खून करून बोगस डॉक्टर असलेला आरोपी जेल, कोर्ट, पोलिसांच्या तावडीतून सहीसलामत सुटल्याचे चित्रण म्हणजे न्यायव्यवस्थेचे एक प्रकारे हननच आहे. मात्र तरीदेखील मालिकेचा शेवट देवीसिंग उर्फ अजित याला शिक्षा होऊन त्याच्यासाठी कडू व प्रेक्षकांसाठी गोड होईल अशी अपेक्षा होती. मात्र त्यासाठी देखील प्रेक्षकांची वाढवलेली उत्कंठता चीड आणणारी आहे. प्रसिद्धी व टीआरपीचा हा एक प्रकारे गैरवापरच म्हणावा लागेल....

भामटेगिरीचा अतिरेक

Image
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवाज काढून सरकारी यंत्रणांकडून चुकीच्या मार्गाने आपली कामे करून घेण्याचा झालेला प्रयत्न म्हणजे भामटेगिरीचा अतिरेकच आहे. अशा पद्धतीने राजकीय नेत्यांचे आवाज व नावे वापरून दबाव आणण्याचे प्रयत्न यापूर्वीदेखील झालेले आहेत. मुळात सरकारी कामांमध्ये सुरू असलेली वशिलेबाजी पूर्णपणे थांबली पाहिजे. नियमबाह्य कामांमध्ये बाहेरील हस्तक्षेप, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दूरच ठेवायला हवा. मोठमोठया नावांचा गैरवापर करून साम, दाम, दंड या नीतीने आपले इप्सित साध्य करू पाहणाऱ्या दलालांची कमतरता समाजात नाही. यात बहुतांश प्रकरणी आर्थिक लोभच अधिक प्रमाणात असतो. यात सरकारी यंत्रणांनाही आमिषे दाखवली जातात. मात्र ज्या दिवशी यंत्रणा कुठल्याही आमिषाला बळी न पडता पारदर्शकपणे, नियम व कायद्यानुसार कामे करतील त्या दिवशी हे प्रकार बंद होतील. वैभव मोहन पाटील घणसोली, नवी मुंबई

पोलिसांचा वचक हवा

Image
मागिल रविवारी हाजी मलंग परिसरात कायदा हातात घेत मारहाणीची घडलेली घटना अत्‍यंत निंदनीय आहे. मात्र या घटनेनंतर प्रचंड मारहाण झालेली असतानाही हद्दीचे कारण देऊन संबंधित तरुणांची तक्रार दाखल करून घेण्यास नकार देण्‍याचा घडलेला प्रकार त्‍याहुन चिड आणणारा होता. वास्तविक गुन्ह्याचे गांभीर्य पाहून पोलिसांना त्याचवेळी या तरुणांची तक्रार दाखल करून घेत त्यांना सहकार्य करायला हवे होते. शून्य नंबरने इतर पोलिस ठाण्यात गुन्‍हा वर्ग करण्‍याचे प्रावधान असतानादेखील अनेक गंभीर गुन्ह्यात पोलिस टाळाटाळ करतात. विनयभंग व मारहाणीच्‍या हया गंभीर घटनेत चौकीत उपस्थित पोलिसांनी त्यांना सदरचे ठिकाण आपल्या हद्दीत येत नसल्याचे सांगत मेडिकल तपासणी करून दुसऱ्या पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले. मारहाणीच्या वेदना सहन होत नसल्याने या तरुणांनी तक्रारीचा नाद सोडत आपल्या भावनांना सोशल मीडियावरून वाट करून दिली. त्‍यानंतर खडबडून जागे झालेल्या स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी २४ तासांनंतर गुन्हा दाखल केला. वास्‍ताविक न्‍याय मिळण्‍यासाठी पोलिसांकडून होत असलेल्‍या दिरंगाईमुळे दाद मागण्‍यासाठी पिडीत आपला स्‍वतंत्र मार्ग निवड...

खेळाडूंना आर्थिक पाठबळ हवे

Image
ऑलिम्पिकसारख्या आंतराष्ट्रीय स्पर्धेत मुळातच महाराष्ट्रातील खेळाडूंचा अंतर्भाव खूपच कमी संख्येने असतो. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी तयार केले जात नाही ही शोकांतिका आहे. ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातील एकही खेळाडू गेला नाही तरी उद्या फार काही फरक पडेल अशी स्थिती नाही कारण जिथे भारतालाच ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्यात कसेबसे यश येते तिथे महाराष्ट्राची काय बात? पण हा विचार करतानाच एखाद्या राज्यातून जर मोठ्या संख्येने खेळाडू जात असतील आणि तुलनेत महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यातून एका हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच खेळाडू जात असतील तर ही विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. याच महाराष्ट्रातून भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळाले होते. खाशाबा जाधव यांनी १९५२ मध्ये कुस्तीत भारताला ब्राँझ जिंकून दिले होते. त्यानंतर भारताला वैयक्तिक पदक मिळवायला तब्बल ४४ वर्षे लागली होती. दोष खेळाडूंचा आहे किंवा एखाद्या क्रीडा संघटनेचा आहे किंवा सरकारचा आहे याला महत्व नाही. मात्र राज्याचे क्रीडाधोरण कसे असते यावर त्या राज्यातील क्रीडा संघटना व खेळाडूंची व...

योग्य संदेश द्या

Image
झी मराठीवरील देवमाणूस ही मालिका १५ ऑगस्ट रोजी निरोप घेणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. पोलीस व न्यायालयाला हातोहात फसवत जेलमधून निर्दोष सुटलेला अजित उर्फ देवीसिंग, मालिकेतील नव्या पात्रांमुळे पुन्हा एकदा प्रचंड अडचणीत सापडलेला आहे व त्याचे सर्व गुन्हे उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सत्यघटनेवर आधारित असलेली ही मालिका वास्तविक घटनेपासून अनेकदा भरकटली. त्यामुळे रटाळ तसेच चीड आणणारे अनेक प्रसंग या मालिकेत पाहायला मिळाले. आता देवीसिंग या खुनी पात्राचा अंत करून एक सकारात्मक संदेश या मालिकेतून दिला जाईल अशी अपेक्षा आहे. समाजात असे अनेक बोगस डॉक्टर राजरोस फिरत असून त्यांना धडा शिकवण्याची गरज आहे. लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या भामटेगिरीला देवमाणूस या मालिकेतून 'योग्य' तो संदेश जाईल व गुन्हेगारी कमी होईल अशी आशा करायला हरकत नाही.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई 

रेल्वे फलाटांवर प्रसाधनगृहे असावीत

Image
स्वच्छ व सुंदर शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबईतील सिडको निर्मित रेल्वे स्थानकांमध्ये फलाटांवर कुठेही प्रसाधन गृहांची सोय नाही. प्रसाधन गृह गाठण्यासाठी प्रवाशांना थेट स्टेशन बाहेर पडावे लागते. सर्वच स्टेशनच्या बाहेर एका बाजूकडील कोपऱ्यात प्रसाधनगृहे बनवण्यात आलेली आहेत जी प्रवाशांच्या दृष्टीने सोयीस्कर नाहीत. अनेकदा नव्या प्रवाशाला ही प्रसाधन गृह कुठे आहे अशी विचारणा करत ते गाठावे लागते. यात लहान मुले, वृद्ध व महिलांचे प्रचंड हाल होतात. त्यात मोठ्या कुचंबनेला सामोरे जावे लागते. प्रसाधन गृह ही लोकांच्या आयुष्यातील अत्यावश्यक बाब असून नवी मुंबईसारख्या स्वच्छतेच्या बाबतीत भरारी घेणाऱ्या शहरात ती नागरिकांना सहज उपलब्ध व्हायला हवीत. यासाठी या शहरातील रेल्वे स्थानकांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा विचार होणे गरजेचे असून स्थानकांमधील फलाटांवर किमान एक प्रसाधनगृह तरी उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेऊन सर्व स्थानकांमध्ये प्रवाशांना सहज उपलब्ध होतील अशा पद्धतीने प्रसाधन गृहांची व्यवस्था करून स्वच्छ व सुंदर नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवावा....

कोरोनासह जगणे क्रमप्राप्त

Image
राज्यातील कोरोनाची भीती आता लोकांच्या मनातून बऱ्यापैकी उतरलेली आहे. आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक काळजी लोक घेऊ लागलेले आहेत. मात्र कोरोनाकाळात घातल्या गेलेल्या निर्बंधांमुळे अनेक व्यावसायीक, उद्योगधंदे, खाजगी नोकरदार वर्ग प्रचंड अडचणीत सापडलेला आहे. गेल्या दीड वर्षांपासून राज्याची ढासळलेली अर्थव्यवस्था रुळावर येत नाही. त्यात निर्बंधदेखील सैल होत नसल्याने लोकांचा संयम ढळू लागलेला आहे. यामुळेच व्यापारी, प्रवाशी आंदोलनाचे हत्यार उपसण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत निर्बंध उठवून पुन्हा एकदा सर्वसामान्य जनजीवन सुरळीत करणे आवश्यक आहे. मुंबई ठाण्यातील निर्बंध उठवलेले असले तरी सामान्यांसाठी लोकलसेवा बंद असल्याने लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. एकीकडे इंधनाचे वाढणारे दर व त्यामुळे वाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. मुंबईत स्वस्त व जलद वाहतुकीचा पर्याय म्हणून लोकलसेवेकडे पाहिले जाते. लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी समजली जाते. मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून ही सेवा सामान्यांसाठी बंद असल्याने लोक अगदीच मेटाकुटीला आले आहेत. अनेक जण तर ...

पाण्याखाली गाण्याचा विश्वविक्रम

Image
आपल्यातील अनेकजण आपली कला वृद्धिंगत करण्यासाठी विविध छंद अंगी जोपासतात. या छंदातून मिळणारे आत्मिक समाधान अद्वितीय असल्यामुळे त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. मात्र आपल्या अंगी असलेल्या या कलेतून समाजोपयोगी उपक्रमांच्या ध्येयाने पछाडलेले फार कमी कलाकार समाजात आहेत व त्यापैकीच एक म्हणजे गायक विराग मधुमालती. हजारो दृष्टीहीनांना दृष्टी देणाऱ्या पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांच्या जीवनचरित्रावर चित्रपट साकारणारे विराग आपल्या सामाजिक जीवनात प्रचंड यशस्वी व्यक्तिमत्व आहेत. नेत्रदानाची चळवळ उभ्या महाराष्ट्रात पसरवणाऱ्या विराग यांनी समाजाला दिलेले योगदान नाकारता येणार नाही. नेत्रहीन लोकांच्या त्रासाची झळ ज्यांना दृष्टी आहे त्यांना कधीच लागणार नाही पण त्याच दृष्टीहीन बांधवांच्या त्रासाची जाण ठेवत आणि नेत्रदानाचा पवित्र संदेश देत तब्बल १०० दिवस डोळ्याला पट्टी बांधत,१०० पेक्षा जास्त नेत्रदान जागरूकता मोहिमा राबवत अनेक वेगवेगळे विश्वविक्रम करत ज्यांनी तब्बल ५ वेळा "गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" मध्ये आपल्या अनोख्या विक्रमांची नोंद केली आहे. आता तर ...

ढिसाळ नियोजनाचा परिणाम

Image
गत आठवडयात झालेल्‍या मुसळधार पावसाने मानवी मर्यादा पुन्‍हा एकदा अधोरेखीत केल्‍या. त्‍याचबरोबर मानव व निसर्ग यांच्यात बिघडत चाललेले संबंधदेखील उघड केले. मानवाने निसर्गावर इतके अतिक्रमण केलेय की एकेकाळी पोटापाण्यासाठी निसर्गावर अवलंबून असणाऱ्या माणसाला आता निसर्गाशी काहीही देणेघेणे नाही अशी परिस्थिती आहे. बिघडलेले ऋतुचक्र निसर्गप्रकोपाची साक्ष देत आहे. अस्ताव्यस्त वाढलेली शहरे, वाढती लोकसंख्या, बळकावलेल्या मोकळ्या जागा, अनधिकृत बांधकामांचे पेव, लुप्त होत चाललेला निसर्ग यामुळे वातावरणात कमालीचा बदल जाणवतोय जो धोकादायक ठरू लागलाय. उन्हाळा असो व पावसाळा मनुष्यहानी नित्याचीच झालीय. यामध्ये सर्वाधिक पिसला जातोय तो गरीब व मध्यमवर्गीय. उच्चभ्रु लोकांना मात्र या कोपाचा फारसा परिणाम जाणवत नाही हे खरे आहे. पावसाच्या पाण्याचे नियोजन हे काम स्थानिक स्वराज्य संस्थांचे असून दीर्घकालीन व्यवस्थापन होत नसल्याने त्याचा दरवेळी त्याचा साचेबद्ध विचार केला जातो. त्यातुन ढगफुटी, मुसळधार पाऊस अशी कारणे देऊन पळवाट शोधली जाते. वास्ताविक, नागरी वस्त्यांमधून जाणारे पाणी ओढे, नद्या, नाल्यांतून समुद्रापर्...