त्रयस्थ संस्थेमार्फत सर्वेक्षण करा
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोगाच्यावतीने राज्यभरात खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली होती. सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणकांच्या मोबाईलवर प्रश्नांची भली मोठी यादी असलेले MSBCC SURVEY हे ॲप देण्यात आलेले असून, त्या माध्यमातून सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. मात्र सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणकांना मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये प्रचंड तांत्रिक अडचणी उदभवत आहेत. एकीकडे 31 जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण संपवण्याच्या सूचना मागासवर्ग आयोगाने दिल्या आहेत, मात्र दुसरीकडे मोबाईल ॲप नीट चालत नसल्याने सर्वेक्षण संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे ठरलेल्या वेळेत हे सर्वेक्षण पूर्ण करणे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जिकिरीचे ठरणार असून घाईघाईत सर्वेक्षण उरकण्याचा प्रयत्नही होऊ शकतो. त्यात सर्व्हे करताना घराघरातून माहिती मिळवतानाही खूप अडचणी येत आहेत. यामुळे अर्धवट, अपूर्ण वा चुकीची माहिती नोंदवली जाण्याची शक्यता अधिक आहे. या प्रक्रियेत काम करणारे बहुतांश कर्मचारी मूळ कार्यभारव्यतिरिक्त विविध अतिरिक्त सरकारी कामांमुळे बेजार आहेत. त्यात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांची काम...