Posts

Showing posts from December, 2020

नव्या वर्षात "संकल्प निरोगी आयुष्याचा"

Image
नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा २०२१ ह्या नव्या कोऱ्या वर्षाची सुरुवात झाली आहे. खरेतर नवीन वर्ष म्‍हणजे उत्‍साहाचे व नव्‍या संकल्पाचे. नवीन वर्ष साजरे करण्याच्या अनेक देशी विदेशी पद्धती आपल्या समाजात दृढ आहेत. कुणी फिरायला शहर सोडून बाहेर पडतो, कुणी कुटुंबासह दिवस घालवतो, अगदीच हौशी मंडळी मित्रमंडळीसह या दिवसाचे सेलिब्रेशन करतो तर काही नव्या वर्षाचे विविध संकल्प सोडून नववर्षाचे स्वागत करतात. एखादा नवा उद्योगधंदा सुरू करण्याचा पण केला जातो, नवे घर, गाडी विकत घेण्याचा संकल्प किंवा दररोजच्या जीवनात ठराविक गोष्ट खाणे सोडणे, वागणे, बोलणे, चालणे यात बदल करण्याचादेखील संकल्प केला जातो. मात्र माणसाच्या आयुष्यात सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्याचे आरोग्य. आरोग्य व्यवस्थित असेल तर त्याला हव्या त्या गोष्टी मिळवण्यात फारशा अडचणी उदभवत नाहीत त्यामुळेच आपले आरोग्य नीट सांभाळण्याचा संकल्प प्रत्येकाने नव्या वर्षात करायला हवा असे माझे मत आहे. नव्या वर्षाकडून आपल्यापैकी प्रत्येकाला अनेक आशा असतात. अनेक प्रकारची नियोजने केलेली असतात. मात्र, आपले न...

व्हर्च्युअल दुनियेत

Image
२६ डिसेंम्बरचे मुशाफिरी सदर वाचले. अत्यंत वेगळा पण सध्याच्या परिस्थितीतील सर्वांच्या जवळचा विषय यात मांडलेला आहे. ऑनलाईन संस्कृती आज सर्वच स्तरांतील घटकांच्या जीवनातील अविभाज्य भाग बनलेली आहे. सभा, कार्यक्रमांच्या ठिकाणची गर्दी व या गर्दीत विविध आजारांच्या संसर्गाचा धोका पाहता गेल्या वर्षभरापासून ऑनलाईल कवी संमेलने, व्याख्याने, पुरस्कार सोहळे, उदघाटने, गायन, नृत्य यांचे सादरीकरण करण्यावर भर दिला जात आहे. यामध्ये वक्ता व श्रोते अलिप्त राहून आपली कला सादर करणे असो वा श्रोत्याची भूमिका निभावण्याच्या भूमिकेत सामील होत असले तरी त्यामध्ये एकाग्रता व परिणामकरता अधिक प्रमाणात येत असल्याचे दिसून येत आहे. एखादा कार्यक्रम आयोजित करण्यातील खर्च, त्या ठिकाणी उपस्थित राहण्याकामी खर्ची पडणारी दगदग व इतर अनेक गोष्टींची बचत या ऑनलाईन ट्रेंडने होत असल्याने हा मार्ग नक्कीच किफायतशीर आहे. मात्र त्यावर अवलंबून असणाऱ्या इतर अनेक सहाय्यभूत घटकांची मात्र गळचेपी होत आहे हेदेखील मान्य करावेच लागेल. त्यामुळेच मुशाफिरीत दोन्ही बाजूंचा केलेला विचार नक्कीच स्वीकारार्ह आहे. यंदाचे वर्ष मुलांच...

विधेयकांवर फेरविचार आवश्यक

Image
केंद्र सरकारनं कृषी क्षेत्राशी संबंधित 3 नवीन विधेयकं संसदेत मंजूर केली असून त्याविरोधात पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील शेतकरी राजधानी दिल्लीत आंदोलन करत आहेत. त्यातील पहिलं विधेयक 'एक देश, एक बाजार' असं असून इथून पुढे शेतकरी आपला शेतमाल स्थानिक बाजार समितीच्या बाहेर देशभरात कुठेही विकू शकतो. आतापर्यंत शेतकरी, अडते म्हणजे मध्यस्थांचा आधार घेत बाजार समित्यांमध्येच आपला माल विकत होता. दुसरं विधेयक आहे कंत्राटी शेतीसंदर्भातलं. त्यानुसार, शेतकऱ्यांनी लागवड करतानाच एखाद्या कॉर्पोरेट कंपनीशी करार करून आपला माल विकत घेण्यासाठी करार करावा यासाठी सरकारने प्रोत्साहन देणार आहे. यातून शेतकऱ्यांना खरेदीची हमी मिळेल आणि मध्यस्थीही टळेल असं सरकारचं म्हणणं आहे. तिसऱ्या विधेयकातील तरतुदींनुसार अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या कक्षेतून डाळी, खाद्यतेल, कांदे, बटाटे, तेलबिया या गोष्टी वगळल्या आहेत. त्यामुळे शेतकरी काही दिवस हा माल साठवून त्याला हवा तो दर मिळेपर्यंत थांबू शकतो. वास्तविक या तिन्ही विधेयकांचा दोन्ही बाजुंनी विचार केला तर ती शेतकरी व खाजगी कँपन्यांच्या ...

असले कसले नववर्ष स्वागत

Image
कोरोना प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभुमीवर सरकारने अनेक बंधने घातली असली तरी इंग्रजी नववर्षाच्या स्वागताची सर्वत्र मोठ्या जोशात तयारी सुरू झाली आहे. समुद्रकिनारे व पर्यटनस्थळे गर्दीने हाऊसफुल्ल होणार हे‍ निश्‍चीत आहे. खरेतर लोकांना नववर्षाच्या स्वागतापेक्षा मौज मजा व पर्यटनासाठी ३१ दिसेम्बर म्हणजे एक हक्काचा उत्सव आहे असेच वाटत असल्याचे दिसून येत आहे. एरव्ही हिंदू नववर्ष सुरू होणाऱ्या दिवशी इतका उत्साह न दाखवणाऱ्या मुंबई महाराष्ट्रातील हौशी मंडळींचा अत्यानंद ३१ डिसेंम्बरचे निमित्त साधून मात्र ओसंडून वाहताना दिसतो. अनेक पर्यटन स्थळे व हॉटेल्समध्ये तर मद्यपान करणाऱ्यांसाठी विशेष सरबराई असते. दारू व जेवणासाठी अनेक आकर्षक ऑफर्स देऊन लोकांना आकर्षित करण्यामागे सर्व हॉटेल व्यावसायिक व इव्हेंट मॅनेजर आघाडीवर आहेत. ३१ डिसेंम्बरच्या मागेपुढे दोनचार दिवस पोलीस व सुरक्षा यंत्रणांना अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून खडा पहारा द्यायला लावण्यात कोणता शहाणपणा आहे समजत नाही. गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी नववर्षाची ही सुरुवात केवळ नशाबाजी, धांगडधिंगा व गुन्हेगारीचे स्वरूप असलेली बनत ...

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

Image
'प्रधानमंत्री मातृ वंदना योजना' माता व बालकांचे निरोगी व सुदृढ आयुष्य आज  प्रत्येक कुटुंबाच्या दृष्टीने प्राधान्‍याचा विषय आहे. आज कोरोना संक्रमणकाळात तर कौटुंबिक आरोग्‍य अबाधित राखणे आपल्‍या सर्वांसाठी अत्‍यंत आवश्‍यक झाले आहे. शासनाकडून माता व बाल आरोग्‍यविषयक अनेक योजना राबिवण्‍यात येत आहेत ज्‍यामध्‍ये जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, मिशन इंद्रधनुष्य, नियमित लसिकरण, पल्स पोलिओ मोहिमा, जननी सुरक्षा योजना, नवजात शिशु उपचार, माहेर घर योजना यासारख्‍या आरोग्य कार्यक्रमांचा समावेश होतो. माता बाल आरोग्य विषयक कार्यक्रमांमुळे राज्यातील माता मृत्यू व बालमृत्यूचे प्रमाणदेखील गेल्या काही वर्षांपासुन आटोक्यात आलेले आहे. गर्भवती महिलेचे आरोग्‍य, आहार या बाबी सुदृढ बालकासाठी खूप गरजेच्‍या आहेत. यासाठी गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार मिळणे अत्‍यंत महत्वाचे आहे. यासाठी त्यांना प्रोत्साहित करुन गर्भवती महिला व जन्माला येणा-या प्रत्येक नवजात बालकाचे आरोग्य सुधारण्यासाठी व राज्यातील मातामृत्यू  व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रणात राहावा या...

त्यांच्या परतीचे मार्ग मोकळे करा

Image
९ डिसेंबर २०२० रोजीच्‍या पुण्‍यातील कोथरुड भागात गव्‍याचा प्रवेश व नंतर त्याचा झालेला मृत्‍यू अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे. मानव व जंगली प्राणी यांच्‍यातील संघर्ष आपण सातत्‍याने पाहत असतो. मात्र जंगलात वास्‍तव्‍य करणारे बिबटया, वाघ, गवा, रानबैल, वानर, सर्प यासारखे प्राणी मुळात मानवी वस्‍तीत प्रवेश का करतात यावर विचारमंथन नक्‍कीच करण्‍याची गरज निर्माण झाली आहे. जंगली प्राणी म्‍हणजे आपले शत्रूच हा मानवी दृष्‍टीकोनदेखील बदलण्‍याची आवश्‍यकता आहे. सिमेंट कॉंक्रीटच्‍या जंगलात निसर्ग लुप्‍त होत चालल्‍याने तसेच  मानवाचे जंगलांवरील अतिक्रमण वाढत चालल्‍याने जंगली पशू थेट मानवी वस्‍त्‍यांमध्‍ये प्रवेश करताना दिसत आहेत. त्‍यांना शत्रू समजून त्‍यांच्‍यावर आक्रमण करण्‍याऐवजी त्‍यांच्‍या सुखरुप परतीचे मार्ग मोकळे करण्‍याची वा शोधण्‍याची गरज आहे. यासंदर्भात अभ्‍यासकांची व तज्ञांची चर्चा घडवून आणून निरनिराळे पर्याय पडताळून पाहावे लागणार आहेत. एखादे जंगली श्‍वापद नागरी वस्‍तीत शिरल्‍यानंतर त्‍याच्‍याबाबतीत निर्माण होणारी घबराट कमी करुन तातडीने त्‍याची सुटका करण्...

नाताळ

Image
नाताळ अर्थात ख्रिसमस हा सण प्रभू येशू यांचा जन्मदिन म्हणून २५ डिसेंबरला जगभरात साजरा केला जातो. भारतातदेखील या सणाचा उत्‍साह अगदी शिगेला असतो. शाळा महाविदयालयांना या काळात अल्‍पकालीन सुटटया जाहीर केल्‍या जातात. बहुतांश शाळांमध्‍ये तर विदयार्थ्‍यांसह हा सण मोठया जल्‍लोशात साजरा केला जातो. वेगवेगळी  शुभेच्छापत्रे, भेटवस्तू एकमेकांना देऊन या सणात परस्परांना शुभेच्‍छा दिल्‍या जातात. रोषणाई करून या काळात आपापल्या घरांना सजवण्याची प्रथा आहे. सध्‍या कोरोना संक्रमण काळ असल्‍याने हा सण साजरा करण्‍यावर मर्यादा आलेल्‍या आहेत. मात्र उत्‍साह कमी झालेला नाही. बाजारपेठा विविध प्रकारच्‍या भेटवस्‍तुंनी सजलेल्‍या आहेत. शाळा बंद असल्‍या तरी यंदा शाळांंनी ऑनलाईन पध्‍दतीने नाताळ साजरा केला. लागोपाठ आलेल्‍या सुटटयांमुळे अनेकांनी पर्यटनाची वाट धरलेली आहे. सूचिपर्णी हे झाड ख्रिसमस वृक्ष म्हणून सजवले जाते. रात्री सांताक्लॉज ही काल्‍पनिक व्‍यक्‍तीरेखा याच दिवशी लहान मुलांसाठी वेगवेगळ्या भेटवस्तू वाटत असतो असा जनमानसात समाज प्रस्थापित आहे. यामुळेच लहान मुलांना या काळात भेटवस्‍तुंचे विशेष आकर्षण अ...

अन्यथा मुंबई वाहनांच्या विळख्यात

Image
कोरोना काळात सार्वजनिक वाहतूकीवर मोठया मर्यादा आल्‍या. रेल्‍वे, बस, रिक्‍शा, टॅक्‍सी यासारखी सार्वजनिक वाहतूकीची साधने मर्यादीत प्रमाणात रस्‍त्‍यावर धावत होती. कोरोना संक्रमण काळ अजून संपलेला नसल्‍याने ही वाहतूक अदयाप पूर्वपदावर आलेली नाही. मुंबईची जिवनवाहिनी समजली जाणारी लोकल रेल्‍वे वाहतूक सर्वसामान्‍यांसाठी अदयापी सुरु झालेली नाही. साहजिकच याचा भार खाजगी वाहतूक व वाहनांवर पडलेला आहे. त्‍यामुळे मुंबईच्‍या रस्‍त्‍यांवर खाजगी वाहनांची संख्‍या सध्‍या प्रचंड वाढलेली आहे. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न मोठया प्रमाणावर आ वासुन उभा आहे. वाशीच्‍या टोलनाक्‍यावर तर दररोज दोन ते तीन किलोमिटरपर्यंत वाहनांच्‍या रांगा लागतात. सहज, सुलभ व सर्वांना परवडेल अशी वाहतूक म्‍हणून ओळखली जाणा-या दुचाकींच्‍या संख्‍येत प्रचंड वाढ झालेली आहे. चालू वर्षी जानेवारीपासुन एकटया मुंबईत तब्‍बल १ लाख दुचाकींची भर पडलेली आहे. मुंबईत प्रति किलोमिटर रस्‍त्‍यांवर जवळपास १२०० दुचा‍की धावत आहेत. सार्वजनिक वाहतूकीच्‍या साधनांची कमतरता पाहता दुचाकी खरेदीकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे. विशेषतः रोज प्रवास करण्‍यासाठ...

ओळ्खपत्रही सक्तीचे हवे

Image
सरकारी कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय परिस्थितीपुरक व रास्तच आहे. गेल्या काही वर्षांपासून सरकारी कार्यालयांमध्ये अनेक कर्मचारी विविध फॅशनचे कपडे परिधान करत असल्याचे दिसून येत आहे. अगदी जीन्स, टीशर्ट यासारखे कपडे वापरण्याचे प्रमाणदेखील अधिक प्रमाणात दिसून येते. वास्तविक परिस्थिती व सोयीनुसार वस्त्रे घालण्यास कोणतीच अडचण नाही मात्र शासकीय कामकाजात कार्यालयीन वेळेत शासनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शिस्त व आदर्शवत वर्तन करायला हवे व त्याची सुरुवात नीटनेटक्या कपड्यांनी करायला हवी हे सरकारी म्हणणे योग्यच आहे. आजवर कर्मचाऱ्यांना कोणताही ड्रेस कोड लागू नव्हता त्यामुळे कपडे परिधान करण्यावर बंधन नव्हते. मात्र आता शासन निर्णयाचे पालन करावेच लागणार आहे. त्यामुळे अगदी मंत्रालयापासून ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत कपड्यांच्या बाबतीतील शिस्त पाळावी लागणार आहे. याच पद्धतीने शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत ओळखपत्र परिधान करणेदेखील बंधनकारक करायला हवे असे मत आहे. सरकारी कार्यालयांमध्ये विविध कामांसाठी नागरिक येत असतात. बऱ्याच वेळा कर्मचाऱ्यांचा परिचय व ओळख नसल्...

सिकलसेल जनजागृती सप्ताह- ११ ते १७ डिसेंबर २०२०

Image
सिकल सेल अॅनिमिया ११ ते १७ डिसेंम्बर या कालावधीत सिकल सेल जनजागृती सप्ताह राबवण्यात येत आहे. सिकल सेल या आजाराविषयी आपल्‍यातल्‍या ब-याच जणांना पूर्ण माहिती नाही. आपण या आजाराविषयी जाहिराती, वर्तमानपत्र किंवा टिव्‍हीवर पाहीले, ऐकले असेल. खरेतर सिकल या शब्दाचा अर्थ विळा किंवा कोयता. ‘सिकल सेल अ‍ॅनिमिया’ हा लाल रक्तपेशींमधील दोषामुळे होणारा आजार आहे. सिकल सेल रुग्णाच्या लाल रक्तपेशी विळ्यासारख्या आकाराच्या, वेडय़ावाकडय़ा दिसतात. त्‍यामुळे या दोषाला सिकल सेल असे नाव आहे.  सिकल सेल रुग्णाच्या लाल रक्तपेशींचा ‘हिमोग्लोबिन’ प्रथिनात दोष आढळून येतो. या प्रकारच्या हिमोग्लोबिनमुळे लाल रक्तपेशींचे आयुष्य कमी होते. परिणामी रक्त कमी होते. याच अवस्थेला आपण ‘अ‍ॅनिमिया’ म्हणतो. त्यामुळे या आजाराला ‘सिकल सेल अ‍ॅनिमिया’ असे नाव पडले. हा आजार पूर्णत: आनुवांशिक आहे. या आजाराचे रुग्ण जगभर सापडतात. पण आफ्रिका, सौदी अरेबिया आणि भारतात या आजाराचे प्रमाण अधिक आहे. माता व पिता दोघेही सिकल सेल वाहक असतील तर त्यांच्या अपत्यांनाही हा आजार होऊ शकतो.त्यामुळे समाजातील...

डीसले सरांच्या बुद्धिमत्तेचा वापर करावा

Image
एकीकडे शिक्षण क्षेत्र हे काहीसे दुर्लक्षित होत असल्याचे चित्र असताना सोलापूरचे उपक्रमशील शिक्षक रणजितसिंह डीसले यांनी जागतिक पातळीवरील सर्वोत्तम शिक्षकाचा पुरस्कार पटकावून अवघ्या देशातील शिक्षणक्षेत्राची मान गौरवाने उंचावली आहे. यामागे त्यांची असलेली मेहनत, बुद्धी व कुशाग्रता याला खरेतर तोड नाही. आजवर क्रीडा, शिक्षण, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात मोठमोठे पुरस्कार पटकवणारे अनेक आसामी आपल्या देशात आहेत. त्यांचा हार, फुले, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र फार तर काही रक्कम देऊन सत्कार, सन्मान करण्यापलिकडे त्यांच्या कुशाग्रतेचा फार वापर झाल्याचे दृष्टिपथात नाही. कायदे, नियम, कल्पना, धोरण तयार करण्यासारख्या बाबी लोकशाहीत लोकप्रतिनिधिंमार्फत होणे अपेक्षित असतात. यासाठी कुशल, उपक्रमशील, प्रयोगशील लोकप्रतिनिधींची गरज प्रत्येक सभागृहाला असते. डीसले सरांसारख्या व्यक्तींच्या सुपिक बुद्धिमत्तेचा यासाठी वापर करून घेतल्यास त्याचा जनतेला नक्कीच फायदा होईल. त्याच अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री व मंत्रीगणांनी म्हटल्यानुसार आगामी काळात डीसले सरांच्या नाविन्यपूर्ण व उपक्रमशील योजना कशा प्रकारे तळागा...

यंदा साधेपणानेच उरका लग्नकार्य

Image
कोरोनाचा कहर कमी होताच पुन्हा एकदा लग्नसराई मोठया जोमात सुरू झाली आहे. हळदी, साखरपुडा, लग्नसमारंभांची लगबग पुन्हा एकदा सर्वच समाजात दिसू लागलेली आहे. मात्र हे करत असताना कोरोनाचा संसर्ग अजून संपलेला नाही हे ध्यानात घेतले पाहिजे. करोनामुळे गर्दी नको म्हणून शासनाने विवाह, कार्यक्रमातील उपस्थितीला मर्यादा घातल्याने गेल्या तीन चार महिन्यांत अनेक कुटुंबांनी आपल्या घरातील लग्नसमारंभ अत्यन्त साधेपणाने साजरे करत नियमांचे पालन केले आहे. त्याचबरोबर लग्नसराईत होत असलेल्या वारेमाप खर्चाला देखील आळा घालण्याचे काम कोरोना काळात प्रकर्षाने दिसून आले आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरे झालेले लग्नसमारंभ आमंत्रण पत्रिकेपासून ते जेवणावळयापर्यंतच्या सर्वच खर्चावर नियंत्रण ठेवणारे ठरले. त्यामुळे कोरोनाने घडवलेला हा सकारात्मक बदल यापुढील काळातदेखील आपण अंगिकरायला हवा जेणेकरून नाहक प्रतिष्ठेपायी आर्थिक दृष्ट्या कर्जबाजारी व उध्वस्त होणारी अनेक कुटुंबे नक्कीच वाचतील. विवाह समारंभाचे रुपांतर विवाह संस्कारा मध्ये करण्याची वेळ आलेली आहे. महागाई वाढली, उत्पन्न घटले, नोकऱ्यां...

वास्तववादी लेख

Image
हळदीला जाताय ? हा लेख वास्तववादी असून आगरी, कोळी समाजाच्या जीवनमानावर प्रकाश टाकणारा आहे. आगरी कोळी लोकांची हळद म्हटली की समोर येतो तो मांसाहारी जेवणावळ्यांचा अस्सल आगरी साज. कोरोना काळात लग्न, साखरपुडे, हळदिं सारख्या कार्यक्रमांवर मर्यादा असली तरी सध्याचे दिवस हे लग्नकार्याचे दिवस आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वच समाजात लग्नांची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे हळदी समारंभही पुन्हा एकदा जोमात सुरू झाले आहेत. आगरी जेवणाची लज्जत काही औरच. मीदेखील यापूर्वी अनेकदा या जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे. विदर्भात जसा सावजी प्रकार प्रसिद्ध आहे तसा आपल्याकडे आगरी लोकांच्या जेवणातील ठसकेदारपणा काही न्याराच आहे. त्यामुळे आगरी कोळी लोकांची लग्ने ज्या प्रमाणे त्यांच्या दिमाखदारपणासाठी ओळखली जातात त्यापेक्षा जास्त त्यांच्या जेवणाच्या चवीसाठी परिचित आहेत. पूर्वापार पासून शेती व्यवसाय करणारा हा घटक गावांचे रूपांतर शहरांत होऊ लागल्याने आपल्या चालीरितींमध्येदेखील बदल करू लागलाय. सिडकोने जमिनींचा विकास करताना त्यांच्या जमिनी मोबदल्यासह अधिग्रहित केल्या व त्यांच्या शेतांच्या जागी...

बॉलिवूड हलवणे सोपे नाही

Image
मुंबईतील फिल्‍मसिटी उत्‍तर प्रदेशमध्‍ये हलवणे सोपे नाही. आज बॉलीवुड कलाकारांना मुंबईइतके सहज व सुरक्षित वातावरण दुसरे कुठेही मिळणे अशक्‍य आहे. उत्‍तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ हे मुंबई दौ-यावर आल्‍यानंतर फिल्‍मसिटीसंदर्भातील चर्चेला ऊत आलेला होता. मात्र प्रत्‍यक्षात उत्‍तर प्रदेशमध्‍ये फिल्‍म इंडस्‍ट्री स्‍थापन करायला पोषक वातावरण आहे का याचा विचार त्‍यांनी करायला हवा. गुन्‍हेगारी कारवायांमध्‍ये अग्रेसर असलेल्‍या उत्‍तर प्रदेशात बेरोजगारीची समस्‍यादेखील मोठया प्रमाणात आहे. अशा ठिकाणी कलाकार मंडळी स्‍थायिक होण्‍यास तयार होणे शक्‍य नाही. प्रत्‍येक प्रदेशाची आपली एक वेगळी ओळख असते, वैशिंष्‍टय असते. त्‍याचा पर्यटनाच्‍या दृष्‍टीने योग्‍य वापर करता आला पाहिजे. पर्यटन वाढले की उदयोग, व्‍यवसायात वृध्‍दी होते व राज्‍याकडे लोकांचा कल वाढतो. मात्र यासाठी उत्‍तर प्रदेशमध्‍ये जाणीवपूर्वक प्रयत्‍न झाल्‍याचे गेल्‍या काही वर्षांमध्‍ये दिसुन आलेले नाही. उत्‍तर प्रदेशलादेखील मोठी ऐतिहासिक पार्श्‍वभुमी असुन अनेक ऐतिहासिक स्‍थळांचा वारसा लाभलेला आहे. मात्र त्‍याचा प्रभावी वापर करणे...

नियमित विजबिले भरणाऱ्यांचे काय

Image
वाढीव विजबिले माफ करण्‍यासाठी राजकीय पक्षांनी सध्‍या राज्‍यभरात रणकंदन माजवले आहे. लॉकडाऊन काळात रिडींग न घेता लॉकडाऊनपूर्वीचा विजेचा वापर पाहून सरासरी विजबिले पाठविण्‍यात आली. मात्र या काळात लोक घरीच असल्‍याने विजेचा वापर वाढला व रिडींग सरासरीपेक्षा जास्‍त होऊ लागले. लॉकडाऊन शिथील झाल्‍यानंतर जेव्‍हा रिडींगप्रमाणे बिल आकारणी सुरु केली गेली तेव्‍हा रिडींगनुसार अपेक्षेपेक्षा जास्‍त विजबिले ग्राहकांना पाठविली गेली. एकदमच भरमसाठ विजबिलांचे आकडे पाहिल्‍यानंतर ग्राहकांवर विजबिलांचा अतिरीक्‍त बोजा आल्‍यासारखा झाला व मग गोंधळ सुरु झाला. अगोदरच आर्थिक अडचणीत सापडलेल्‍या सर्वसामान्‍य नागरीकांना वाढीव विजबिले भरणे अडचणीचे ठरत आहे ही बाब खरी आहे. अनेक ग्राहकांनी तर लॉकडाऊनमध्‍ये बिलेच न भरल्‍यामुळे त्‍यांच्‍या थकबाकीचे आकडेही खूप मोठे आहेत. त्‍यामुळे विजबिलांचा एकदम पडलेला आर्थिक भार सर्वसामान्‍यांना न परवडणारा आहे. त्‍यामुळे विजबिलांमध्‍ये सवलत ही दिली गेलीच पाहिजे. मात्र सवलत देत असताना लॉकडाऊन काळातदेखील नियमित विजबिले भरणा-या नागरिकांचादेखील विचार होणे गरजेचे आहे. अन्‍यथा विजबिलां...

इ-संजीवनी ओपीडी ऑनलाइन मोफत आरोग्यसेवा

Image
इ-संजीवनी ओपीडी ऑनलाइन मोफत आरोग्यसेवा आज एखादया किरकोळ आजारावर उपचार घ्‍यायचा म्‍हटला तरी कोरोनाची भिती पाहता दवाखान्‍यात जाऊन तपासणी करायला थोडी भितीच वाटतेच. कोरोना प्रादुर्भाव अजुन पुर्णपणे संपलेला नसल्‍याने घराबाहेर पडल्‍यानंतर या विषाणुच्‍या  संक्रमणाची भिती आहेच. त्‍यामुळे सरकारने आता यावर मार्ग काढत घरबसल्‍या नागरिकांना आरोग्‍य सेवा मिळवुन देण्‍यासाठी पुढाकार घेतला आहे. इ संजीवनी ओपीडी ही ऑनलाइन टेलिमेडिसीन आरोग्य सेवा एप्रिल महिन्यापासुन राज्‍यभरात सुरू करण्यात आली आहे. ही सेवा पूर्णपणे मोफत उपलब्‍ध असुन मोठया प्रमाणावर रुग्‍ण या सेवेचा लाभ घेत आहेत. या सेवे द्वारे रुग्णांना विडियो कॉन्फरन्सिंगचा वापर करून थेट घरबसल्या वैद्यकीय अधिकार्‍यांशी आजाराबाबत सल्लामसलत करता येते. सदर सेवेमार्फत रुग्ण सर्व आजारांबाबत वैद्यकीय अधिकार्‍यांशी सवांद साधू शकतात. तसेच कोवीड १९ साथीच्या आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण जे घरी उपचार घेत आहेत किंवा विलगीकरण करण्यात आलेल्‍या रुग्णांना देखील या सेवेचा लाभ होत आहे. किरकोळ आजाराच्‍या व्‍यक्‍तींना या सेवेचा उपयोग चांगल्‍या प्रकारे होत असु...