आरोग्य विभागाची संयुक्त रोग सर्वेक्षण मोहीम
राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्ये २०२५ पर्यंत असंसर्गजन्य रोगांमुळे होणा-या अकाली मृत्यूंच्या संख्येमध्ये एकचतुर्थांश इतकी घट करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. तसेच सन २०२५ पर्यंत क्षयरोग निर्मुलनाचे उददीष्ट ठेवण्यात आले आहे. असंसर्गजन्य आजारांमुळे जवळपास ६३ टक्के मृत्यू होतात. प्रामुख्याने ३५ ते ६५ वयोगटातील व्यक्तींमध्ये हे आजार आढळून येत असल्यामुळे देशाच्या विकासावर याचा मोठा परिणाम संभवतो. देशात साधारणतः मधुमेह ६ टक्के, उच्चरक्तदाब १५ टक्के तसे दर 1 लाख लोकसंख्येमागे कर्करोगाचे १०० रुग्ण आढळुन येतात. जिवनशैलीतील बदल, व्यायामाचा व हालचालीचा अभाव, आहारातील बदल, वाढता ताणतणाव, तंबाखू सेवन, धुम्रपान, मदयपान इत्यादी गोष्टींमुळे व्याधींमध्ये वाढ होत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र शासनाकडून कर्करोग, महुमेह, ह्रदयविकार यासारख्या असंसर्गजन्य रोगांवर प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहेत. यामध्ये या रोगांचे उपचार उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्हा आरोग्य विभागाकडूनही वारंवार उपाययोजना व विविध प्रकारच्या मोहीम हाती घे...