Posts

Showing posts from June, 2019

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा

Image
मुंबईत रस्ते असो वा रेल्वे मार्ग पावसाळ्यात दरवर्षी सर्वत्र पाणी भरते व वाहतूक खोळंबते. शुक्रवारी पडलेल्या मुसळधार पावसात पुन्हा एकदा हा अनुभव आला. पालिका व रेल्वे प्रशासनाची मुसळधार पावसाला सामोरे जायची तयारीच नसल्याने मुंबईची वाहतूक कमालीची मंदावली व त्याचा फटका पुन्हा एकदा चाकरमान्यांना बसला. उशिरा दाखल झालेल्या पावसानंतरदेखील पावसाळापूर्व कामे अर्धवट अवस्थेत असतील तर ते मुंबईकरांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य व्यवस्थापन आखणे गरजेचे असते मात्र त्याकडे दरवर्षी दुर्लक्ष केले जाते व पाणी थेट रस्त्यावर व रेल्वे ट्रॅक वर येते. मुंबईसारख्या हायटेक शहरात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पावसाळ्यात योग्य उपाययोजना आखायला हव्यात. मात्र प्रशासनाच्या उदासीन धोरणांमुळे मुंबईकरांची अवस्था रोज रडे त्याला कोण मरे अशी झाली आहे.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई 

वाहनांचा दहशतवाद रोखायचा कसा?

Image
येत्या जुलैपासून मुंबईत नो पार्किंगमध्ये वाहन लावणाऱ्या वाहनचालकांना दहा हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. मुंबईत वाढलेली भरमसाठ वाहने व त्याचा रस्ते वाहतुकीवर होत असलेला विपरीत परिणाम भविष्यातील सर्वात मोठी समस्या आहे. मुंबईत वाहन पार्किंगसाठी जागाच उपलब्ध नसल्याने बहुतांश ठिकाणी वाहने थेट रस्त्यावरच उभी केली जातात. हीच वाहने अनेकदा वाहतुकीस अडथळा ठरतात व ट्रॅफिकच्या समस्येस कारणीभूत ठरत असतात. या पार्श्वभूमीवर नो पार्किंगचे नियम अधिक कडक करणे गरजेचेच आहे. मात्र मूळ समस्येसाठी हा नियम कायमस्वरूपी पर्याय ठरू शकत नाही. मुंबईमध्ये अमर्यादित संख्येत वाढत चाललेली वाहनसंख्या हेच मूळ कारण वाहतुकीच्या सततच्या उडणाऱ्या बोजावाऱ्यास आहे. मुंबईतील आज एकही मुख्य रस्ता असा नाही जो वाहनांनी पूर्णपणे व्यापलेला नाही. दर दिवशी सरासरी 40 लाख वाहने मुंबईच्या रस्त्यावर धावत असतात. यात दुचाकी व कारची संख्या सर्वाधिक आहे. या वाहनांमुळे रस्त्यावर धावणारी वाहने साधारणतः 20 किलोमीटर प्रतिताशी वेगापेक्षा अधिक वेगाने धावत नाहीत हीदेखील वस्तुस्थिती आहे. सकाळ संध्याकाळच्या ट्रॅफिकच्या वेळी तर हा वेग ताशी 10 ...

सामाजिक कार्यातील असामान्य व्यक्तीमत्व - श्री गणेश हिरवे सर

Image
माझ्यातील वृत्तपत्रलेखक जागता ठेवण्यामध्ये हिरवे सरांचा मोठा वाटा  नमस्कार, आमचे परममित्र व सामाजिक कार्यातील मार्गदर्शक श्री गणेश हिरवे सरांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. खरेतर हिरवे सरांशी माझा परिचय गेल्या चार पाच वर्षांचाच. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो व विचारांची जुळणी झाल्याने संपर्क वाढला आणि नंतर त्यांच्या अनेक सामाजिक उपक्रमांचा मीदेखील एक भाग झालो. खरेतर आपल्यासारख्या कुटुंबवत्सल लोकांना कुटुंब, नोकरी वा व्यवसाय या जबाबदाऱ्यातुन वेळ काढणे म्हणजे एक दिव्यच. त्यातून वेळ मिळालाच तर आपण एखादा आवडीचा छंद जोपासतो. माझेच उदाहरण घेतले तर कौटुंबिक व्याप व नोकरीतील व्यस्तता यातून दररोजच्या लिखाणासाठी वेळ देणे फारच जिकरीचे होत होते. त्यातुनच लोकलप्रवासात लिखाण करण्याचा मध्यम मार्ग मी निवडला. (हा लेखदेखील लोकलप्रवासातच लिहिला आहे बरं). असो, तर दैनंदिन व्यापातून वेळ काढून सामाजिक बांधिलकी जोपासणे व समाजकार्यात स्वतःला झोकून देणे हा विचार सर्वसामान्य व्यक्ती करू शकत नाही. मात्र गणेश हिरवे सरांचे कार्य व त्यांची त्यातील तत्परता आपण जर पहिली तर...

आरोग्य निर्देशांकात महाराष्ट्राची गरुडझेप

Image
निती आयोगाचा ‘निरोगी राज्य, प्रगतीशील भारत' अहवाल प्रकाशित महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य सेवेत गेल्या काही वर्षांपासून अमूलाग्र असे बदल होताना दिसत आहेत. यामुळे शासकीय आरोग्य सेवेचा दर्जा निश्चितच उंचावला आहे. त्याचीच पोचपावती नुकतीच केंद्र शासनाच्या एका अहवालातून मिळाली आहे. राज्याच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून आरोग्य सेवेत महाराष्ट्राने गुडझेप घेतली आहे असेच म्हणावे लागेल. आरोग्य क्षेत्रातील कामगिरीबाबत निती आयोगाने जारी केलेल्या health index मध्ये महाराष्ट्राने मोठी कामगिरी करत सहाव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर भरारी घेतली आहे. गेल्या वर्षीच्या अहवालात सहाव्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्राने यावेळी तिसरा क्रमांक मिळवलाय. केरळ पहिल्या, आंध्र प्रदेश दुसऱ्या आणि महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. आरोग्य सेवेचे विविध निकष लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने ही रँकिंग जारी करण्यात येत असते. नीती आयोगाने जारी केलेली ही रँकिंग 2017-18 या वर्षातील आहे. महाराष्ट्राने 2015-16 च्या रँकिंगमध्ये सहावा क्रमांक मिळवला होता. यावेळच्या...

बेस्ट सेवा महानगरपालिकेने हाताळावी

Image
देशाच्या सर्वात महत्वाच्या नगरीतील स्थानिक वाहतूक व्यवस्था हाकणाऱ्या बेस्ट परिवहन सेवेला गेल्या काही वर्षांपासून घरघर लागली आहे. मुंबईतील बहुसंख्य नागरिक आज वाहतुकीसाठी बेस्ट चा वापर करत असले तरी 'नाकापेक्षा मोती जड' या उक्तीप्रमाणे बेस्टचा देखभाल खर्च महामंडळाला परवडनेसा झालाय. याच कारणामुळे बेस्टसेवा तोट्यात जात असून कामगारांच्या वेतनावरूनदेखील प्रशासनाचे त्यांच्याशी खटके उडत आहेत. मुंबईच्या काही भागांतील तोट्यात चालणारे मार्ग व इंधनदरांत झालेली वाढ ही मुख्य कारणे यामागे आहेत. खड्डेजन्य रस्त्यांमुळेदेखील बस वारंवार नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत आहेत. बेस्टला पुन्हा सुगीचे दिवस आणायचे असतील तर ही सेवा पूर्णतः मुंबई महानगरपालिकेने हाताळावी किंवा तिचे खाजगीकरण तरी करून टाकावे. ह्या बसेस कुणीही चालवल्या तरी अखेर नागरिकांना एक चांगली व परवडणारी वाहतूक सेवा उपलब्ध होणे हेच उद्दिष्ट या सेवेमागचे आहे, नाही का?  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई

आला पावसाळा, आरोग्य सांभाळा

Image
आला पावसाळा, आरोग्‍य सांभाळा  अस हय करणा-या उन्‍हाळयानंतर आता सुखद गारवा देणा-या पावसाळयास सुरुवात झाली आहे. पावसाळयाचे दिवस हे आपल्‍या सर्वांच्‍याच दृष्‍टीने तसे आनंदाचे असतात. मुंबईसारख्‍या शहरी भागातील लोकांना हे दिवस थंड वातावरणामुळे तर ग्रामीण भागात शेतीवर उपजिविका असल्‍यामुळे प्रिय असतात. मात्र दरवर्षी येणारा पावसाळा विविध साथीच्या आजारांनादेखील आमंत्रण देत असतो हेदेखील आपल्‍याला विसरुन चालणार नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. या दिवसामध्ये योग्य आहार आणि साथीचे आजार टाळण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना केल्‍या तर हया आजारांपासुन आपल्‍याला संरक्षण करता येते व पावसाळा ख-या अर्थाने आपल्‍याला सुखद जाणवेल. यासाठी डॉक्‍टरांचा सल्ला अत्‍यंत आवश्‍यक आहे. या दिवसात बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. तसेच दूषित पाणी पिण्यासाठी वापरले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. लहान मुलांकडेही लक्ष दिले पाहिजे. त्यांना किरकोळ वाटणार्‍या आजारांसंदर्भात तत्काळ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. पावसाळ्यामध्ये वातावरणात बदल झाल्यामुळेही अनेक आजार उदभव...

अडवली भुतावली शाळेत शालेय प्रवेशोत्सव

Image
नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र ४१,अडवली भुतावली या शाळेत दिनांक १७ जून २०१९ रोजी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला.  स्वच्छ, सुंदर व उपक्रमशील असलेल्या अडवली भुतावली या शाळेने गेल्या दोन वर्षांत  गावाबरोबरच नवी मुंबई महानगरपालिकेचे नाव महाराष्ट्रभर अनेक आदर्श उपक्रमाने गाजविले आहे. सालाबादप्रमाणे यंदाही मुलांचा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी  नगरसेवक श्री रमेश डोळे, माजी नगरसेवक श्री चंद्रकांत पाटील, माजी नगरसेवक मुब्रा ठाणे  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री मोहनदादा डोळे, दानशूर आणि J A B S international   कंपनीचे मालक श्री मेरुभाई चौहान, डाएट बदलापूर ठाणेच्या सौ सावंत मॅडम या मान्यवरांच्या हस्ते पहिलीच्या नवागत मुलांचे स्वागत करून पाठ्यपुस्तके  खाऊ आणि  फुले देऊन त्यांना गौरवण्यात आले. इ १ली ते ८वी च्या उपस्थित विद्याथ्यांना याप्रसंगी मान्यवारांच्या हस्ते पाठ्यपुस्तके वाटप केली गेली. श्री मेरुभाई चौहान यांनी 2000 वह्या शाळेच्या या पहिल्या दिवशी मुलांना वाटप केल्या. त्यांचे शाळेकडून मुख्...

महाराष्ट्रातील सर्व व्यवहार मराठीतून व्हावेत

Image
महाराष्ट्राशेजारील राज्ये आपल्या भाषेचा कडवा पुरस्कार करत असताना महाराष्ट्रात मात्र मराठी भाषेला म्हणावा तितका सन्मान मिळत नाही ही शोकांतिका आहे. आज ग्रामीण व शहरी भागात मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे आणि त्यादेखील अखेरच्या घटका मोजत आहेत. आजच्या स्पर्धेच्या युगात राज्यातील नागरिकांनाही आपल्या पाल्यांसाठी पूर्णवळ मराठी माध्यम नकोसे झालेय. या पार्श्वभूमीवर राज्यात चालवल्या जाणाऱ्या सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी सक्तीसाठी कडक कायदे करावे लागत असतील तर तेदेखील महाराष्ट्र व मराठीचे दुर्दैवच म्हणावे लागेल. महाराष्ट्रात सर्वप्रथम सर्व सरकारी व खाजगी अस्थापनांवरील कामकाज मराठीत करावे लागेल. राज्यातील सर्व नोकऱ्यांमध्ये मराठी सक्ती अंगिकारावी लागेल. सर्व प्रकारचे व्यवहार मराठीत करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील तरच मराठीजनांचा ओढा पुन्हा एकदा मराठीकडे वळेल व राज्यात मराठीला सुगीचे दिवस येतील.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई

आरोग्य विभागामार्फत "जागतिक योग दिन" उत्साहात साजरा

Image
'योग' ही भारताने जगाला दिलेली एक देणगी आहे असे म्हटले जाते. आणि त्यामुळेच २१ जून रोजी भारतात साजरा होणारा 'जागतिक योग दिवस' आज जगभरात साजरा केला जात आहे. काल २१ डिसेंबर २०१९ रोजीदेखील हा दिवस संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा झाला. रांची येथील प्रभात तारा मैदानात देशाचे पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जागतिक योग दिन साजरा झाला तर महाराष्ट्रात देखील नांदेड येथे मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस व योग गुरू बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत हा दिवस साजरा करून हजारो लोकांनी सामुदायिक योगासने केली. मुंबईत आरोग्य विभागामार्फत देखील आरोग्य आयुक्तालयाचे मुख्यालय असलेल्या आरोग्य भवन येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आरोग्य आयुक्त डॉ अनूप कुमार यादव सर, नामांकित योग प्रशिक्षक डॉ सतीश पाठक, आरोग्य सेवेतील अधिकारी श्री संजय पतंगे, डॉ तानाजी माने, डॉ घोलप, डॉ मारुळकर, डॉ खरात आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. प्रथमतः दीपप्रज्वलन व धन्वंतरी पूजनाने कार्यक्रमाचा आरंभ केला गेला. तद्नंतर आयुष विभागाचे सहाय्यक संचालक डॉ घोलप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ता...

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने..

Image
आज २१ जून म्हणजे जागतिक योग दिवस. आज आपल्या आजूबाजूला विविध आजारांनी, व्याधींनी त्रस्त असणारे रुग्ण आपल्याला पावोलोपावली दिसतात. ओसंडून वाहणारी रुग्णालये व दवाखान्यांमधील गर्दी याची साक्ष आपल्याला देतील. पारंपरिक आजारांची व उपचारांची जागा आता संसर्गजन्य व अससंसर्गजन्य आजार अशा नव्या आधुनिक नावांनी घेतली आहे. त्यावरील निरनिराळ्या उपचार पद्धती व शस्त्रक्रिया जर आपण पहिल्या तर त्यासाठीच्या वैद्यकीय खर्चाचे आकडे पाहूनच गरगरायला होते. अशातच आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे कमालीचे दुर्लक्ष करत आहोत असे माझे मत आहे. घर ते कार्यालय यामधील प्रवासात व कामात आपण इतके गुरफटलेले आहोत की मानसिक तणाव व शारीरिक व्याधी आपल्यामध्ये कधी घर करतात हे आपल्याला कळतही नाही. लहान मोठ्या व्याधींसाठी जवळपासच्या किंवा ओळखीच्या डॉक्टरकडे जाऊन जुजबी औषधोपचार करून घेतो व हा औषधोपचार असंख्य वैद्यकीय चाचण्यांसह वर्षानुवर्षे तसाच पुढे चालू ठेवतो. याचा परिणाम शरीराची रोग प्रतिकारशक्ती कमी होण्यात तसेच मानसिक संतुलन ढासळण्यात होतो हे अनेक संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. बळावणारा आजार हा गरीब, श्रीमंत, उच...

शाळा प्रवेशोत्सव..

Image
नवी मुंबईच्या अडवली भुतावली शाळेत वर्षाचा पहिला दिवस उत्साहात साजरा नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र ४१,अडवली भुतावली या शाळेत दिनांक १७ जून २०१९ रोजी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला.  स्वच्छ, सुंदर व उपक्रमशील असलेल्या अडवली भुतावली या शाळेने गेल्या दोन वर्षांत  गावाबरोबरच नवी मुंबई महानगरपालिकेचे नाव महाराष्ट्रभर अनेक आदर्श उपक्रमाने गाजविले आहे. सालाबादप्रमाणे यंदाही मुलांचा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी  नगरसेवक श्री रमेश डोळे, माजी नगरसेवक श्री चंद्रकांत पाटील, माजी नगरसेवक मुब्रा ठाणे  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री मोहनदादा डोळे, दानशूर आणि J A B S international  कंपनीचे मालक श्री मेरुभाई चौहान, डाएट बदलापूर ठाणेच्या सौ सावंत मॅडम या मान्यवरांच्या हस्ते पहिलीच्या नवागत मुलांचे स्वागत करून पाठ्यपुस्तके  खाऊ आणि  फुले देऊन त्यांना गौरवण्यात आले. इ १ली ते ८वी च्या उपस्थित विद्याथ्यांना याप्रसंगी मान्यवारांच्या हस्ते पाठ्यपुस्तके वाटप केली गेली. श्री मेरुभाई चौहान यांनी 2000 वह्य...