योगामुळे वाढते एकाग्रता - योग दिनाच्या निमित्ताने अक्षरदीपमध्ये मुलांची योगासने
घणसोली येथील अक्षरदीप क्रिएशन्समध्ये जागतिक योग दिन साजरा नवी मुंबईच्या घणसोली येथील अक्षरदीप क्रिएशन्स येथे शनिवार दिनांक २१ जून २०२५ रोजी जागतिक योग दिन मोठया उत्साहात मुलांच्या योगासनांच्या प्रात्यक्षिकांद्वारे साजरा करण्यात आला. योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची योगासने केली. कठीण प्रकारातील अनेक आसने यावेळी सादर करत आपण नियमितपणे विविध प्रकारची योग आसने करत असल्याचे मुलांनी दाखवून दिले. अक्षरदिपच्या विद्यार्थ्यांनी सकाळ व सायंकाळच्या सत्रात आयोजित करण्यात आलेल्या योग दिनाच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. योगासनांसारख्या घरच्या घरी करता येण्याजोग्या व्यायामाची मुलांना आवड निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे अक्षरदीपच्या संचालिका सौ स्वाती भाकले यांनी सांगितले. विद्यार्थी जीवनातच मुलांना योगासनांची सवय लागली तर त्यांचे शरीर व मन शुद्ध राहील आणि त्यांची अभ्यासातील एकाग्रता वाढण्यास मदत होईल असे मत सौ भाकले यांनी व्यक्त केले. अक्षरदीपच्या माध्यमातून महिला व मुलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. मुलांसाठी अँबॅकस, वेदिक मॅ...