मुंबईवर आदळणारे लोंढे थोपवा
मुंबईवर आदळणारे परप्रांतीयांचे लोंढे पहायचे असतील तर रोज सकाळी मुंबईबाहेरून भरभरून येणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्या पहाव्यात. इतक्या अतिप्रचंड संख्येत मुंबईत होत असलेले स्थलांतर भविष्याच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे. याचा थेट परिणाम उद्या येथील नागरी सुविधांवर होणार आहे. हजारोंच्या संख्येने बाहेरील राज्यांमधील लोक आज मुंबई शहरात नोकरी धंद्यांच्या शोधात येत आहेत ज्यावर कुणाचेच नियंत्रण नाही. मुंबई हे सर्वधर्मीय लोकांचे वास्तव्य असलेले शहर आहे असे अनेकदा अभिमानाने म्हटले जाते मात्र मूळचे महाराष्ट्रातील व मराठी नागरीकांच्या या शहरात इतर भाषिकांचे अतिक्रमण तरी कीती व्हावे याला काही मर्यादा असाव्यात की नाही? साहजिकच या गर्दीचा सर्वात जास्त भार रेल्वेसेवेवर पडतो जी मुंबईत सर्वात स्वस्त व जलद वाहतुकीचा मार्ग समजली जाते. पूर्वी केवळ नऊ डब्यांच्या चालवल्या जाणाऱ्या लोकल वाढती गर्दी पाहता कालांतराने बारा डब्यांच्या झाल्या व आता तर पंधरा डब्यांच्या लोकलदेखील वाढत्या गर्दीला कमी पडू लागल्या आहेत. इतकी गर्दी या शहरात स्थलांतरित होतेय पण कुणालाही त्याची तमा नाही. लोंढे थोपवण्यासाठी कुठल्याही ठोस ...