छुप्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही
सार्वजनिक ठिकाणी पाळावयाचे नियम व शिस्तीबाबत शासनाच्या विविध विभागांनी नियम ठरवून दिलेले आहेत. या नियमांचे पालन नीट होते की नाही, सार्वजनिक ठिकाणांवर लोकांची सुरक्षा व आरोग्याच्या बाबतीत दक्षता घेण्याची जबाबदारी मुख्यत्वे स्थानिक प्रशासन व पोलिसांची आहे. मात्र मुंबई व उपनगरांतील जवळपास सर्वच गल्लीबोळात ह्या नियमांचे तीन तेरा वाजवल्याचे चित्र आहे. फेरीवाले, चहा, खाद्यपदार्थांच्या टपऱ्या गॅस- सिलेंडरसह सर्रास उघड्यावर अनधिकृतपणे सर्व नियम धाब्यावर बसवून व्यवसाय करताना दिसतात. अतिशय बिनधास्तपणे सुरू असलेले हे उद्योग प्रशासन व पोलिसांच्या छुप्या पाठिंब्याशिवाय सुरू राहणे शक्यच नाही. अशा प्रकारच्या आर्थिक तडजोडी करून ठिकठिकाणी आपला जम बसवण्यामध्ये परप्रांतीय लोक आघाडीवर आहेत. फेरीवाले व इतर व्यवसायांसाठी ठराविक जागा व नियम निश्चित केलेले असताना जिथे जागा दिसेल तिथे हे उद्योग सुरू असल्याचे पाहायला मिळते. तसेच आजकाल मोकळ्या जागा, उड्डाणपूल, उद्याने ही मद्यपी, कॉलेज तरुण तरुणी, उनाड मुले, गर्दुल्ले यांचे अड्डे झाल्याचेही पाहायला मिळते. अनेक प्रकारे सुरू असलेले हे न पहाव...