पारदर्शकता आवश्यक


सरकारी गृहनिर्माण योजनांच्या धोरणात बदल करताना एका लाभार्थीस एकच घर देण्याच्या निर्णयाचा फायदा या घरांसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना निश्चितपणे होणार आहे. मात्र या घरांच्या सोडतीमध्ये सहभाग घेणाऱ्या लोकांची प्रचंड संख्या व घरांचे आवाक्याबाहेर गेलले भाव पाहिले तर सर्वसामान्य नागरिकांना याचा किती फायदा होईल याबाबत साशंकता आहे. त्यापेक्षा महाराष्ट्रीयन व अल्पबचत गटातील लोकांसाठी अधीकची घरे आणि त्यासाठी निकषांच्या पडताळणीमध्ये पारदर्शकता आणली तर ते सर्वसामान्यांच्या दृष्टीने जास्त लाभदायक होईल असे वाटते. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त