बेरजेशिवाय गत्यंतर नाही


शिवसेना भाजप ह्या पारंपरिक युतीमध्ये 'थोरल्या बंधुत्वाच्या' मुद्द्यावरून अनेकदा वादाचे प्रसंग आले. ह्या वादाची कितीही धुसफूस असली तरी हिंदुत्व व सत्ताकारणाच्या मुद्यावर तसेच महाराष्ट्रात विरोधकांना मात देण्यासाठी त्यांनी युतीमध्ये कधी खंड पाडला नाही. निवडनूकीपूर्वी किंवा नंतर युतीविना हे दोन्ही पक्ष अधुरेच आहेत. मात्र देशातील व राज्यातील सध्याचे एकंदरीत राजकीय वातावरण तसेच भाजपकडे नेते व कार्यकर्त्यांचा वाढता ओघ पाहता युती झाली जागावाटपाचे गणित म्हणावे तितके सोपे नक्कीच नाही. शिवसेनेची पाळेमुळे राज्यातील कानाकोपऱ्यात रुजलेली आहेत तर भाजपकडे तगड्या उमेदवारांचा प्रचंड भरणा आहे. अशा परिस्थितीत अनेक मतदारसंघात जागावाटपावरून तिढा निर्माण होण्याची शक्यता असून एन निवडणुकीत दोन्ही पक्षांकडून बंडखोरीची संभावना आहे. सोमवारी एका पत्रकाद्वारे युतीची घोषणा करण्यात आली असली तरी युतीला अंतिम स्वरूप मिळण्यासाठी अजून बरेच टप्पे पार पडायचे आहेत त्यामुळे युतीबाबत काय अंतिम निर्णय होईल हे पाहण्यासाठी काही वेळ थांबावे लागेल. मात्र दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले तरी स्वबळावर सत्ता मिळवणे जिकीरीचे ठरणार असल्याने निवडणूक निकालानंतर सत्तेच्या गणितामध्ये दोन्ही पक्षांना बेरीज करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही हेदेखील तितकेच खरे आहे.   

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त