लोकल सुरू झाल्यास गर्दीला जबाबदार कोण?
- Get link
- X
- Other Apps
पर्यायाचे आव्हान हा लेख (दिनांक २६ ऑक्टोबर) वस्तुस्थितीचा वेध घेणारा आहे. लॉकडाऊन काळात निर्माण झालेला सार्वजनिक वाहतुकीचा सावळागोंधळ अजुन मिटलेला नाही. मुंबई व उपनगरांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेल्या भरमसाठ गर्दीचा ताण स्वस्त व जलद वाहतुक म्हणून रेल्वेवर पडत आहे. याच रेल्वेला पर्याय म्हणून उभ्या राहिलेल्या मोनो, मेट्रोसारख्या सुविधांचा म्हणावा तसा दिलासा मुंबईच्या गर्दीला झालेला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वाहतुक सेवा मर्यादीत असल्यामुळे त्यांचादेखील फार परिणाम दिसुन येत नाही. मात्र आजवर कधीही अनुभवास न आलेल्या कोरोना टाळेबंदीच्या काळात पुरेसा वेळ मिळाल्याने गर्दी व सार्वजनिक परिवहन सेवांची सांगड घालुन उपाययोजना करता येणे शक्य होते. राज्य सरकार, केंद्र सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपापल्या अखत्यारीतील परिवहन सेवांना घेऊन एकत्रितरित्या हा प्रश्न सोडवावयास प्राधान्य दयायला हवे. मात्र तसा सामोपचाराचा प्रयत्न अदयापी न झााल्याने सार्वजनिक आहतूक आजदेखील प्रचंड संभ्रमावस्थत आहे. विविध उपायांव्दारे मुंबई लोकलवरील भार हलका करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक झालेले नाहीत. उदया लोकलसेवा पून्हा एकदा पूर्ण क्षमतेने सुरु झाली तर परिस्थीती पूर्वीप्रमाणे जैसे थे असेल हे वेगळयाने सांगायला नको. या परिस्थीतीत कोरोनाला अटकाव करणार कसा याचे उत्तर कोण देणार? ज्यांच्या अखत्यारीत रेल्वे येते ते केंद्र सरकार, ज्यांच्या हददीतून लोंढेच्या लोंढे मुंबईकडे प्रवास करतात त्या महानगरपालिका की कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्नशील असणारे राज्य सरकार?
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment