त्यांच्या परतीचे मार्ग मोकळे करा
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
९ डिसेंबर २०२० रोजीच्या पुण्यातील कोथरुड भागात गव्याचा प्रवेश व नंतर त्याचा झालेला मृत्यू अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे. मानव व जंगली प्राणी यांच्यातील संघर्ष आपण सातत्याने पाहत असतो. मात्र जंगलात वास्तव्य करणारे बिबटया, वाघ, गवा, रानबैल, वानर, सर्प यासारखे प्राणी मुळात मानवी वस्तीत प्रवेश का करतात यावर विचारमंथन नक्कीच करण्याची गरज निर्माण झाली आहे. जंगली प्राणी म्हणजे आपले शत्रूच हा मानवी दृष्टीकोनदेखील बदलण्याची आवश्यकता आहे. सिमेंट कॉंक्रीटच्या जंगलात निसर्ग लुप्त होत चालल्याने तसेच मानवाचे जंगलांवरील अतिक्रमण वाढत चालल्याने जंगली पशू थेट मानवी वस्त्यांमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. त्यांना शत्रू समजून त्यांच्यावर आक्रमण करण्याऐवजी त्यांच्या सुखरुप परतीचे मार्ग मोकळे करण्याची वा शोधण्याची गरज आहे. यासंदर्भात अभ्यासकांची व तज्ञांची चर्चा घडवून आणून निरनिराळे पर्याय पडताळून पाहावे लागणार आहेत. एखादे जंगली श्वापद नागरी वस्तीत शिरल्यानंतर त्याच्याबाबतीत निर्माण होणारी घबराट कमी करुन तातडीने त्याची सुटका करण्याचे मार्ग शोधावे लागतील. मानव व प्राण्यांतील निसर्गनिर्मित भेद संपुष्टात आणुन त्यांचे विलीनीकरण परवडणारे नाही.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment