पर्यटन सुरू व्हावे

कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्यातील बहुतांशी व्यवहार सुरू झालेले आहेत. महाराष्ट्र हे विविधता व निसर्गसौंदर्याने नटलेले राज्य असून येथील पर्यटनासाठी राज्यभरासह देश विदेशातून लोक येतात. लॉकडावूनच्या काळात पर्यटन व्यवसाय सर्वात बाधित झाला आहे जो अद्यापि सुरू होऊ शकलेला नाही. या व्यवसायाशी निगडित घटक जसे हॉटेल्स, टूर्स ट्रॅव्हल्स, गाईड्स, स्थानिक व्यवसायिक मोठ्या प्रमाणावर बाधित आहेत. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक व इतर पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोरोनाचा कहर आता बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आहे. रोजगारासाठी पर्यटनावर अवलंबून असलेल्या लोकांची वाताहत पाहता सरकारने आता पर्यटन स्थळे सुरू करण्यास हरकत नाही. पर्यटनातून लोकांचेदेखील मानसिक परावर्तन होत असल्याने कोरोनाच्या विवक्षित मानसिकतेतून बाहेर पडण्यास त्यांना मदत होणार आहे. ऐतिहासिक स्थळे, गडकिल्ले, समुद्रकिनारे, धार्मिक स्थळांवरील पर्यटन सुरू करून त्यावर रोजगारासाठी अवलंबून असलेल्या लोकांना दिलासा देण्याची वेळ आलेली आहे. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments