असे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने एका शिवपर्वाचा अस्त झाला आहे. शिवचरित्राच्या निर्मितीसाठी व प्रसारासाठी आपले अवघे आयुष्य खर्ची घातलेल्या बाबासाहेबांमुळे छत्रपतींच्या आयुष्यातील लहानसहान गोष्टी सर्वांसमोर आल्या. ही माहिती जमवण्यासाठी त्यांनी तरुण वयापासून शिवछत्रपती जिथे जिथे गेले त्या स्थानाचे अक्षरशः उंबरठे झिजवले. त्यातुनच जगाला आदर्श ठरलेल्या शिवचरित्राची निर्मिती झाली. आपल्या धगधगत्या वाणीने शिवरायांच्या आठवणींना जेव्हा पुरंदरे उजाळा देत त्या वेळी तरुणाई महाराजांच्या विचारांनी प्रेरित होत असे. शिवाजी महाराज घराघरात पोहोचवण्यामध्ये बाबासाहेबांचा वाटा नक्कीच मौलिक राहिला. शिवचरित्रावर पंधरा हजारांच्या वर व्याख्याने केलेल्या बाबासाहेबांचे आयुष्य सर्वसामान्य नव्हते. त्यांच्या वाणीतून महाराजांच्या सानिध्याचा भास व्हायचा. छत्रपतींच्या विचारांनी भारावलेले असे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments