गणेशोत्सवात कोकणात जादा रेल्वे बस गाड्या सोडा
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मुंबई व उपनगरांत सर्वाधिक आहे. मिळेल ते वाहन पकडून उत्सवकाळात कोकणी ग्रामस्थ कुटुंबासह गावाकडे प्रवास करतात. गणपतीच्या काळातले रेल्वेचे आरक्षण सुरू झाल्याझाल्या फुल्ल होत असल्यामुळे अनेक लोक रस्तेमार्गे बस व खाजगी वाहने घेऊन कोकणात जातात. मात्र कोकणातील रस्त्यांची अवस्था वर्षानुवर्षे अत्यंत दयनीय असल्याने त्यांचा हा प्रवासदेखील त्रासदायक ठरतो. यंदाही यापेक्षा काही वेगळी अवस्था नाही. ना रेल्वेचे ना बसचे तिकीट उपलब्ध अशी अवस्था असल्याने आता बहुतांश चाकरमान्यांची मदार जादा रेल्वे व बस गाड्यांवर आहे. खाजगी वाहतूकवाले प्रवासाचे अवाच्या सव्वा दर आकारत असल्यामुळे भर गणेशोत्सवात लोकांवर प्रवासाचा जादा आर्थिक भार पडतो. सर्वाधिक लोक रस्ते मार्गे प्रवास करत असल्यामुळे वाहतूक कोंडीचाही मोठा फटका प्रवाशांना बसतो. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवात मोठ्या आनंदाने श्रीगणेशाचे स्वागत करण्यासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा यंदाचा प्रवास तरी सुखकर व्हावा यासाठी महामार्गाची दुरुस्ती करून अधिकच्या बस गाड्या, रेल्वे कोकणात सोडल्या जाव्यात अशी अपेक्षा आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment