घणसोलीतील वास्तू साफल्य सोसायटीत माघी गणेशोत्सव व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
घणसोलीतील वास्तू साफल्य सोसायटीत माघी गणेशोत्सव व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
घणसोलीतील वास्तू साफल्य को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या प्रांगणात सालाबादप्रमाणे यंदाही दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजी माघी गणेशोत्सव तसेच सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन सोसायटीच्या वतीने करण्यात आले. सोसायटीतील लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा पार पडल्या. त्यानंतर स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा व सोसायटीतील चांगल्या गुणांनी उत्तीर्ण शालेय मुलांना प्रोत्साहनपर भेटवस्तूचे वाटप सोसायटीच्या वतीने करण्यात आले. जवळपास २२ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या वास्तू साफल्य सोसायटीच्या आवारात श्री गणेशाचे सुंदर मंदिर बनवण्यात आले असून १५ वर्षांपासून माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. सोसायटीत एकूण ४ विंग असून ४२ कुटुंबे वास्तव्य करत आहेत. सोसायटीत १४ दुकानेदेखील आहेत. सर्व हिंदू सण उत्सव सोसायटीमध्ये रहिवाशांच्या सहभागातून उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करण्यात येतात. श्री शंकर जुनघरे हे वास्तू साफल्य सोसायटीचे अध्यक्ष असून श्री शैलेश वनमाळी हे सचिव तर हरिकेश बहादूर सिंग हे खजिनदार म्हणून काम पाहत आहेत. माघी गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी मोठा उत्साह सोसायटीच्या सभासदांमध्ये असतो व परिसरातील अनेक मान्यवर ह्या उत्सवास भेट देत असल्याचे सोसायटी सदस्य मंगेश देवकर यांनी सांगितले. सोसायटीतील यंदाच्या माघी गणेशोत्सवास मा नगरसेविका सुवर्णा पाटील, समाजसेविका योजना कदम, अंकुश कदम, कुरेशी, घणसोलीतील वृत्तपत्रलेखक व सामाजिक कार्यकर्ते वैभव पाटील आदी मान्यवरांनी भेट देत सोसायटीच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment