जागतिक आरोग्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर

डी बी मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबीर संपन्न
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने मुंबईच्या डी बी मार्ग पोलीस दवाखान्याच्या वतीने बुधवार दिनांक ९ एप्रिल २०२५ रोजी दि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागपाडा येथील पोलीस रुग्णालयाचे पोलिस शल्यचिकित्सक डॉ गजानन सानप यांच्या हस्ते ह्या रक्तदान शिबीराचे उद्घाटन पार पडले. डी बी मार्ग पोलीस ठाण्याच्या तळमजल्यावरील हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ह्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 
डी बी मार्ग पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड यांनी व त्यांच्या अधिपत्याखाली कार्यरत पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी बहुमोल योगदान दिले. पोलिस ठाण्यामधील सर्व अधिकारी व कर्मचारी या सर्वानी ह्या शिबिरात सक्रिय सहभाग नोंदविला. रक्तदान शिबिरासाठी जे.जे. रुग्णालयातील  महानगर रक्तपेढीचे डॉ पगारे व यांच्या चमूने मदत केली. डी बी मार्ग पोलीस दवाखान्यात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ सुभाष घोलप व त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचारी यांनी शिबीर आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. उन्हाळ्यात रक्तदान कमी प्रमाणात होत असल्याने वैद्यकीय उपचारासाठी रक्ताच्या बाटल्यांचा तुटवडा जाणवतो असे डॉ पगारे यांनी सांगताना रक्तसाठा वाढवण्यासाठी अशा प्रकारची रक्तदान शिबीरे उपयुक्त ठरत असल्याचे स्पष्ट केले. एकूण 40 जणांनी रक्तदान करून ह्या रक्तदान शिबिरात रक्तदान करून शिबिर यशस्वी केले. रक्तदान शिबिरास उपस्थित सर्व मान्यवर व रक्तदात्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. ह्या सर्वांचे डॉ सुभाष घोलप यांनी आभार व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त