ह तर चीनची कुटील रणनीती

पॅन्गांगत्सो सरोवर परिसरातून भारत व चीन दोन्ही देशांनी आपापले सैन्य मागे घेण्याचा निर्णय भारताच्या गेल्या अनेक दशकांच्या लढाईचा निश्चितच विजय आहे. मात्र चीनवर इतक्या सहजासहजी विश्वास ठेवणे धोकादायक आहे. भारत चीन सीमेवरील कुरघोड्यांमध्ये चिनी सैन्याला कधीही सफल होऊ न दिलेल्या भारताला कुटील रणनीतीने गाफील करण्याचा प्रयत्न या माध्यमातून असू शकतो. चीनचे भारताविषयी अरेरावीचे धोरण लपून राहिलेले नाही. पाकिस्तानसारख्या दहशतवादी देशाला भारताविरुद्ध कुमक पूरवण्यासाठी चीन अग्रेसर राहिला आहे हे विसरून चालणार नाही. एकेकाळी भारतीय बाजारपेठा चीनच्या सामुग्रीनी व्यापलेल्या दिसायच्या. मात्र सध्याचे भारताचे आत्मनिर्भर धोरण चीनचा तिळपापड करणारे आहे. चीनवर अवलंबून असलेली भारतीय अर्थव्यवस्था आज स्वयंपूर्ण होत असून चीनमधून होणाऱ्या आयातीलादेखील उतरती कळा लागलेली आहे. चिनी बनावटीची अनेक मोबाईल एप्लिकेशन्स भारताने बँद केलेली आहेत ज्या माध्यमातून चीनवर हेरगिरीचा आरोप सातत्याने होत होता. कोरोनासारख्या जागतिक महामारीला चीन जबाबदार असल्याचे जगमान्य झाले आहे. जागतिक महासत्तेकडे वाटचाल करत असलेल्या भारताला रोखण्यासाठी व परावलंबी बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारा चीन इतक्या सहजासहजी वठणीवर येईल असे वाटत नाही. त्यामुळे चीनने मागे घेतलेले हे पाऊल कुटनीतीचा नवा अध्याय लिहिण्यासाठी तर नाही ना याच्या शक्याअशक्यता पडताळाव्या लागतील. 


वैभव मोहन पाटील 

घणसोली, नवी मुंबई 


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त