समाज व नेत्यांनी चिंतन करण्याची गरज

मराठा समाज हा पूर्वीपासूनच प्रगत व सुशिक्षित म्हणून गणला जात असला तरी महाराष्ट्रात बहु संख्येत असलेल्या ह्या समाजातील अनेक कुटुंबे उदरनिर्वाहासाठी झगडत असल्याचे वास्तव आहे. मागासवर्गीय समाज आरक्षणाच्या आधारे शैक्षणिक व रोजगार क्षेत्रात पुढे जात असताना मराठा समाजातील काही घटक मागे पडले. राज्याच्या सत्ताकारणात अनेक मराठा नेते आपल्या समाजाच्या बळावर मोठमोठ्या पदांवर पोहोचले. ह्या नेते मंडळींनी मराठा समाजास आरक्षण अथवा सामाजिक स्थिरता देण्यासाठी फार मोठे प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार ४३.७६ टक्के मराठा महिला उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत असल्याची बाब पुढे येत असेल तर इतकी वर्षे मराठा समाजातून सत्तेवर बसणाऱ्या नेत्यांनी याबाबत चिंतन करणे गरजेचे आहे. समाजासाठी ह्या नेत्यांचे योगदान किती यावर समाजानेच विचार करायला हवा. मराठा समाजाला शिक्षण व रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणून ह्या समाजातील खऱ्या अर्थाने वंचित व गरीब कुटुंबांना लाभ मिळायला हवेत याविषयी दुमत असण्याचे कारण नाही. मात्र यासाठी समाजानेच आता झारीतील शुक्राचार्य शोधून त्यांना त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त