वाचन संस्कृती जोपासायला हवी
गेल्या ३१ मे २०२४ रोजी पश्चिम रेल्वेतून सेवानिवृत्त झालेले मोटरमन चंद्रशेखर सावंत यांनी आपल्या सेवनिवृत्तीला पुस्तके भेट देण्याचे आवाहन मित्रमंडळी, सहकारी तसेच आप्तस्वकीयांना केले होते. सेवानिवृत्तीला जमा होणारी पुस्तके शालेय विद्यार्थ्यांना भेट देण्याचा त्यांचा मानस होता. त्यानुसार जमा झालेली व काही खरेदी केलेली पुस्तके त्यांनी पालघर जिल्ह्यातील काटी या दुर्गम गावातील जिल्हा परिषद शाळेत ग्रंथालय निर्मितीसाठी काल कार्यालयात येऊन माझ्याकडे सुपूर्द केली. या वेळी त्यांच्यासोबत आमचे मित्र जॉयचे संस्थापक गणेश हिरवे सर हेदेखील उपस्थित होते. पश्चिम रेल्वेतील सेवेची ३२ वर्षे पूर्ण करून सावंत सेवानिवृत्त झाले. अंधेरी येथील रेल्वे ब्रिज दुर्घटनेदरम्यान त्यांच्या असामान्य कामगिरीसाठी त्यांना रेल्वेने तसेच अनेक शासकीय व स्वयंसेवी संस्थांनी गौरवले आहे. पश्चिम रेल्वेने त्यांचा आदर्श मोटरमन म्हणून गौरव करत रु ५ लक्षच पारितोषिक दिले त्यातील ३ लाख रुपये त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांसाठी दिले. सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांनी वाचन संस्कृती जोपासण्याप्रति दाखवलेल्या स्तुत्य सद्भावनेसाठी त्यांना मनःपूर्वक धन्यवाद व पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा..
वैभव
Comments
Post a Comment