निकृष्ट खाद्यपदार्थ लोकांनीच टाळावेत


पाकिस्तानी वा बांग्लादेशी लोक अवैधरित्या वास्तव्य करत असल्याच्या घटना देशात नव्या नाहीत. महाराष्ट्रात व मुख्यत्वे मुंबईत ही संख्या अधिक असावी. परराष्ट्रीय धोरणे आपल्या देशात काहीशी शिथिल असल्यामुळे अशा लोकांच्या अनधिकृत राहण्यावर कुठलेही नियंत्रण राहिलेले नाही. थोडया आर्थिक स्वार्थापायी अशा लोकांना निवास व इतर सोयीसुविधा सहजरीत्या उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे अगदी आधार, पॅन, रेशन, मतदान कार्डदेखील बाळगून वर्षानुवर्षे एखाद्या भागात बिनदिक्कतपणे हे लोक मुक्काम ठोकत आहेत. मात्र दहशतवादी कृत्यांना समर्थन देणाऱ्या राष्ट्रातील हे लोक भारतीयांशी किती प्रामाणिक असतात याची अनेक गंभीर उदाहरणे आपण पाहिली आहेत. यामुळे अनेक अतिरेकी व गुन्हेगारी घटनांमध्ये ह्या लोकांचा हातभार लपून राहिलेला नाही. छोटीमोठी गुन्हेगारी कृत्ये करून हे लोक सामाजीक वातावरण दूषित करण्याचादेखील प्रयत्न वारंवार करताना दिसून येतात. अवैध वास्तव्य करणारे असे लोक शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे मोठे आव्हान पोलीस आज यंत्रणांसमोर आहे. त्यामुळे जागरूक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते - संस्थांनीच पुढाकार घेऊन अशा लोकांविरुद्ध आवाज उठवत त्यांना पोलिसांच्या हवाली करायला हवे. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त