वात्सल्य ट्रस्ट येथे जॉय ऑफ गिव्हिंगचा दिवाळी भेट उपक्रम

सानपाडा (नवी मुंबई) येथील वात्सल्य अनाथालयातील बालिका व वृद्धांसमवेत येत्या शनिवारी जॉय ऑफ गिव्हिंग साजरी करणार दीपावली  
जॉय ऑफ गिव्हिंगचा दिवाळी भेट उपक्रम 

शनिवारी २ नोव्हेंबर २०२४ रोजी दिपावली पाडव्याचे निमित्त साधून जॉय ऑफ गिव्हिंग ह्या सोशल ग्रुपच्या वतीने सानपाडा (नवी मुंबई) येथील वात्सल्य ट्रस्टच्या बालिकाश्रम व वृद्धाश्रमात दिवाळी भेट उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जॉयचे सभासद सदर अनाथाश्रमात उपस्थित राहून जवळपास ५० अनाथ व वृद्धांना दिवाळी फराळ व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणार आहेत. १९८३ साली स्थापन झालेल्या वात्सल्य ट्रस्टने आजवर हजारो बालिका व वृद्धांना मायेचा आधार दिला आहे. जेष्ठ व बालिका असे आजी - नातींचे अनोखे नाते येथे पाहायला मिळते. जॉयचे अध्यक्ष श्री गणेश हिरवे सरांच्या सूचनेनुसार मागील शनिवारी पनवेलच्या वनवासी कल्याण आश्रमातील कार्यक्रम आटोपून मी, डॉ घोलप, भूषण, मीना भूतकर असे जॉयचे सभासद या आश्रमास भेट देण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी ह्या ट्रस्टचे व्यवस्थापक श्री काळे यांनी आम्हाला ह्या अनाथाश्रमाबद्दल माहिती देत परिसर दाखवला. यावेळी येथील वृद्ध मंडळीशी चर्चाही केली. त्या सर्वांनी येथील व्यवस्था व वातावरण खूपच चांगले असल्याचे सांगितले. त्यानंतर तात्काळ येत्या शनिवारी पाडव्याच्या दिवशी जॉयचा सलग दुसरा दिवाळी भेट उपक्रम येथे राबवण्याचे निश्चित केले आहे. जॉयच्या ह्या उपक्रमाने भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला येथील वृद्ध व मुलींच्या चेहऱ्यावर नक्कीच दिवाळीचा आनंद खुलणार यात शंका नाही. 


वैभव

Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा