मलेशियातील आंतराष्ट्रीय स्पर्धेत अक्षरशिल्प पामा इंडिया मुलांची दमदार कामगिरी - ४४ विद्यार्थ्यांनी पटकावली पदके

नवी मुंबईच्या घणसोली शाखेच्या विद्यार्थ्याचे सुयश
मलेशियातील क्वालालंपुर येथे पार पडलेल्या २३ व्या आंतराष्ट्रीय पामा ग्लोबल ॲबॅकस अँड मेंटल एरिथमॅटीक स्पर्धेत अक्षरशिल्प इंडियाच्या विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर दैदिप्यमान यश मिळवले. सन १९९९ पासून आंतराष्ट्रीय स्पर्धांची परंपरा जपणाऱ्या PAMA आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यंदा २८ देशांतील ५९९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांना आंतराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या पामा इंडिया अक्षरशिल्प संस्थेतील मुलांनी देशाचा गौरव वाढवला आहे. यात अक्षरशिल्पमधील ८ विद्यार्थ्यांनी चॅम्पियन्स, ७ जणांनी द्वितीय क्रमांक, १७ जणांनी द्वितीय तर १२ जणांनी तृतीय क्रमांक पटकावत एकूण ४४  पदकांची लयलूट करत आंतराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला. या स्पर्धेत नवी मुंबईच्या घणसोली येथील अक्षरशिल्प शाखेतील कु आर्या रोहन लोखंडे ह्या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांकाचे पदक पटकावले. या स्पर्धांच्या माध्यमातुन देशाची बुद्धिमान पिढी घडवण्यात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या अक्षरशिल्प पामा इंडियाचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारतीय विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर मिळवलेले हे यश विद्यार्थ्यांसह सांघिक असून यात शिक्षक, पालक, संस्थाचालक यांचे एकत्रित योगदान असल्याचे मत घणसोली शाखेच्या संचालिका सौ स्वाती बाकले यांनी व्यक्त केले. 

वैभव पाटील

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त