आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर

डॉ. दा. भ. मार्ग पोलीस दवाखान्यामार्फत आरोग्य तपासणी व रक्त दान शिबीर
सशस्र पोलिस मुख्यालय ताडदेव यांच्या माध्यमातून पोलीस प्रशिक्षण सभागृहात येथे मंगळवार दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सर जे. जे. रुग्णालयीन रक्तपेढी मार्फत सदरचे रक्तदान शिबीर  घेण्यात आले. डॉ. दा. भ. मार्ग पोलीस दवाखाना मधील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी ताडदेव येथील सर्व पोलीस बांधवांची आरोग्य तपासणी करून त्यांचेवर औषधोपचार केले. तसेच ताडदेव पोलीस दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी  यांनी देखील सदर कामात मदत केली. या शिबिरात  वजन, उंची करून BMI ची नोंद घेण्यात आली. तसेच Heamoglobin, blood sugar व blood cholesterol ई रक्ताच्या  तपासण्या करण्यात आल्या. ह्या शिबिरात १२६ पोलीस कर्मचारी व अधिकारी तसेच पोलीस वसाहतीमधील त्यांच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करण्यात आली व १९ दात्यांनी रक्तदान केले. सशस्र पोलिस मुख्यालय ताडदेव यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मौसमी पाटील यांनी शिबिराचे उद्घाटन करून आपल्या अधिपत्याखालील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सक्रीय सहभाग नोंदविला. सहायक पोलीस आयुक्त श्री. पाटील तसेच सहायक पोलीस आयुक्त श्रीमती शबाना शेख मॅडम यांनी देखील शिबिरात उपस्थिती लावली. डॉ. दा. भ. मार्ग पोलीस दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष घोलप व इतर आरोग्य कर्मचारी यांनी सर्व यंत्रणा व पोलीस कार्यालयामध्ये समन्वय साधून शिबीर यशस्वी करण्यासाठी योगदान दिले. तसेच जे. जे. रुग्णालयातील रक्तपेढीतील डॉ. सोनाली थोरात व त्यांच्या टीमने रक्तदान शिबीराकरिता आवश्यक कर्मचारी वर्ग व साधनसामुग्री उपलब्ध करून दिली.

Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा