सावधान.. तापमान वाढतेय



निवडणुकांमुळे देशातील राजकीय वातावरण तापू लागलेले असतानाच वाढत्या तापमानानेही आपला हिसका दाखवण्यास सुरुवात केली आहे. सध्या उष्णतेच्या झळा देशभरात सर्वत्रच बसत आहेत. कधी नव्हे इतकी गर्मी एप्रिलच्या सुरुवातीलाच जाणवू लागली आहे. ग्लोबल वार्मिंग, पर्यावरणाचा नको तितका ऱ्हास, वाढत्या शहरीकरणाने फोफावलेली सिमेंटची जंगले व असंतुलित पर्जन्यमान यामुळे वातावरणात फार झपाट्याने बदल होताना दिसत आहेत. मध्य व उत्तर पश्चिम भारतात येत्या दोन महिन्यांत तापमान सरासरीपेक्षा 0.5 ने वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिला असला तरी तापमान वाढीचा फटका देशातील इतर भागांनादेखील बसू शकतो. वाढती उष्णता व त्याचा जनजीवनावर होणारा विपरीत परिणाम पाहता त्यादृष्टीने आवश्यक दक्षता नागरिकांनी व प्रशासनाने घ्यायला हवी. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त