फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा आदर्श


भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ही दोन व्यक्तमत्वे आज समाजात व शिक्षण क्षेत्रात आदर्शवत मानली जातात. विपरीत परिस्थितीत साक्षरतेचा व उच्च शिक्षणाचा अट्टाहास धरणारे ह्या दोन असामान्य व्यक्तिमत्वांच्या जयंत्या योगायोगाने एकाच महिन्यात साजऱ्या होतात. त्यामुळे संयुक्त जयंत्यांचे मोठमोठे कार्यक्रम सर्वत्र साजरे होत असतात. मात्र सलग 14 तास अभ्यास करून ही संयुक्त जयंती अनोखिरीत्या साजरी करून फर्ग्युसन कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. या दोन महामानवांची जयंती म्हणजे विचारांचे सोने लुटण्याचा दिवस. त्यामुळे या दिवशी पुस्तकी विचार लुटण्याचा अट्टाहास धरणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुकच व्हायला हवे. मोठमोठ्या आवाजाचे डीजे लावून, नाचगाणे करून जयंती उत्सव साजरे करण्यापेक्षा अशा प्रकारे अभ्यासाने हा दिवस सत्कारणी लावण्याच्या भूमिकेचे सर्व स्तरांतून स्वागत व्हायला हवे. फर्ग्युसन कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा आदर्श इतर शिक्षण संस्थांनीही घ्यावा. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त