उन्हाचा कहर
उन्हाचा कहर
उन्हाने सर्वत्र अगदीच कहर केलेला आहे. कधी नव्हे इतकी गर्मी सध्या राज्याच्या जवळपास सर्वच भागांत होत आहे. आटलेले जलस्रोत व लोप पावत चाललेला निसर्ग यांचा परिणाम म्हणून सर्वत्र उष्णता हाहाकार करत आहे. वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करणे हेच आज सर्वांचे मुख्य उद्दिष्ट झाले असून ग्रामीण व शहरी भागातील परिस्थिती वेगळी नाही. विदर्भात तापमानाने सर्वाधिक उच्चांक गाठला असून मानवी व प्राणी जीवनासाठी ही धोक्याची घंटा आहे. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेली लग्नसराई व निवडणुकांनी तापलेल्या वातावरणात वाढते ऊन तेल ओतण्याचे काम करत आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघाटापासून वाचण्यासाठी आवश्यक उपाययोजना स्वतःच कराव्यात.

Comments
Post a Comment