कुटुंबव्यवस्था काचेच्या भांड्यासारखी..

कौटुंबिक कलह व वादविवाद समाजात नवे नाहीत. हे कलह बऱ्याचदा संशय व गैरसमजुतीतून घडत असतात. मात्र यातून कुटुंबातील एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत मजल जात असेल तर ती बाब अत्यंत धक्कादायकच आहे. पती पत्नी म्हणा किंवा कुटुंबातील आणखी एखादे नाते, हे विश्वास व प्रमाणिकपणावर टिकत असते. संशयाने त्यात प्रवेश करताच त्यात वितुष्टता येत असते. कुटुंबातील वादाचा परिणाम कुणावर तरी हल्ला करून त्याचा जीव घेण्यापर्यंत होत असेल तर कौटुंबिक विचारमंथनाची गरज समाजात निर्माण झाली आहे असेच म्हणावे लागेल. भारतीय कुटुंबव्यवस्था आज म्हणावी तितकी सक्षम राहिलेली नाही. विभक्त कुटुंब पद्धती व आपुलकीचा होत चाललेला ऱ्हास यामुळे तिची अवस्था आज काचेच्या भांड्यासारखी झाली आहे. 

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त