मतदान यंत्रे आता जीपीएसच्या देखरेखीखाली

मतदान यंत्रे आता जीपीएसच्या देखरेखीखाली

वाहनांवर, रुग्णवाहिकांवर जीपीएस प्रणाली लावून वाहने ट्रॅक करण्याची पद्धत फार पूर्वीच अस्तित्वात आली आहे. मात्र आता थेट मतदान यंत्रे घेऊन जाणाऱ्या वाहनांवरच ही प्रणाली बसवण्यात येत असल्यामुळे चर्चा होणे स्वाभाविक आहे. खरेतर निवडणूक काळात मतदान प्रक्रियेशी संबंधित सर्व साहित्य सामग्री यांची सुरक्षितता खूप महत्त्वाची असते. मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना निवडणूक आयोग आखताना दिसत आहे. त्या दृष्टीने येत्या लोकसभा निवडणुकीत आवश्यक दक्षता घेतली जात असून निवडणूक प्रक्रियेवर घेतले जाणारे संभाव्य आक्षेप दूर होण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न म्हणजे प्रतिबंधात्मक काळजी म्हणता येईल. मतदान यंत्रे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस प्रणाली बसवल्याने जिल्हा मुख्यालयात बसून या वाहनांचे लोकेशन पाहता येणार असल्यामुळे वाहनांत बिघाड झाल्यास किंवा वाहन मतदान केंद्रावर वेळेवर पोहोचू न शकल्यास तातडीने पर्यायी व्यवस्था करता येणे शक्य होणार आहे शिवाय मतदान साहित्याची सुरक्षितता देखील अबाधित राखता येणार असल्यामुळे आयोगाचा हा निर्णय स्वागतार्हच म्हणावा लागेल. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त