चला पोलिओ मुक्तीकडे
चला पोलिओ मुक्तीकडे
आपल्या परिसरात आरोग्य विभागाच्या वतीने सतत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत असल्याचे आपल्याला दिसून येते. पोलिओ सारख्या भयंकर आजाराच्या निर्मूलनासाठी राबवण्यात येणाऱ्या ह्या मोहिमेबद्दल नेहमीच आपल्या मनात एक कुतूहल व उत्सुकता असते. आपल्या घरातील 5 वर्षांपर्यंतच्या लहान बाळांना ही लस देण्याइतपत या आजाराची माहिती आपणाला असते. मात्र हा पोलिओ आजार नेमका काय आहे हे जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करू या. पोलिओ हा मज्जासंस्थेवर पारिणाम करणारा आजार असून त्यामुळे गंभीर आजार जसे अर्धांगवायू किंवा मृत्यु देखील होऊ शकतो. पल्स पोलिओ लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविल्यामुळे सन १९९९ पासून देशात पोलिओ रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आहे. ० ते १५ वर्षाखालील बालकांमध्ये शरीराच्या कोणत्याही अवयवाला अचानक आलेला लुळेपणा तसेच संशयित पोलिओ रुग्ण असणा-या कोणत्याही वयाच्या व्यक्तीच्या शरीराला अचानक आलेला लुळेपणा ही या आजाराची लक्षणे ठरू शकतात. पोलिआचा रोग प्रसार हा प्रामुख्याने अस्वच्छतेमुळे, दुषित मैलापाणीच्या संपर्कामुळे तसेच अप्रत्यक्षणे दुषित पाणी, दुध किंवा अन्नातून होतो. ८० टक्कयांपेक्षा जास्त रुग्ण हे वयाची तीन वर्षे पुर्ण होण्यापुर्वी आढळतात. तोंडावाटे देण्यात येणा-या पोलिओ डोसव्दारे रोगाचा प्रभावी प्रतिबंध करता येतो. लसीकरणाच्या वेळापञकाप्रमाणे तोंडावाटे पोलिओ लसीचे डोस नित्यक्रमाने देण्यात येतात. तसेच पुरक लसीकरण म्हणजेच राष्ट्रीय लसीकरण दिवस - NID व उपराष्ट्रीय लसीकरण दिवस -SNID हे ५ वर्षे वयापर्यंत राबविण्यात येते. जागतिक आरोग्य संघटनेने १९९८ सालापासून ‘पल्स पोलिओ’ची मोहीम सुरू केली. दरवर्षी साधारणतः जानेवारी व फेब्रुवारीत ‘पोलिओ रविवार’ साजरे केले जातात. लोकांच्या घरोघरी जाऊन ‘पोलिओ रविवार’च्या नंतरच्या आठवडय़ात ५ वर्षांखालील मुलांना पोलिओ डोस पाजले जातात. अमिताभ बच्चन यांच्यासारख्या नामांकित कलावंताना हाताशी धरून दूरचित्रवाणीच्या माध्यमातून लोकांना भावनिक आवाहन केले गेले आणि लोकजागृती सुरू ठेवली. त्यामुळे या मोहिमेचा प्रभाव फार वेगाने पसरला. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार आफ्रिका खंडही पोलिओ निर्मूलनाच्या मार्गावर आहे. भारतीय आरोग्य क्षेत्राच्या दृष्टीने सुवर्णक्षरांनी लिहिण्याचा दिवस म्हणजे २७ मार्च २०११ हा दिवस. याच दिवशी जागतिक आरोग्य संघटनेने दक्षिण आशिया विभागाला म्हणजेच भारत, नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंका, ब्रह्मदेश या देशांना पोलिओमुक्त झाल्याचं प्रशस्तिपत्रक प्रदान केले.

Comments
Post a Comment