लाईफलाईन ठरतेय डेड लाईन

स्टंटबाजाना आवरण्याची गरज

मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये अल्पवयीन व कॉलेज मुले सातत्याने स्टंटबाजी करताना आढळतात. या स्टंटबाजीने अनेकांचा जीव जात आहे. हे स्टंटबाज लोकलच्या दरवाजावर लटकून प्रवास करतात ज्याचा त्रास लोकलमधून प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांना तसेच चढण्या-उतरणाऱ्या प्रवाशांना होतो. स्टेशनवर कितीही गर्दी असली तरीही हो मुले लोकलचा दरवाजा सोडत नाहीत. परिणामी प्रवाशांना प्रचंड त्रास होतो व अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. स्टंटबाजी करताना ही मुले कधी पूर्ण शरीर चालत्या लोकलच्या बाहेर काढतात तर कधी स्टेशन प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या करामती करताना दिसतात. फटका मारून मोबाईल चोरी, चैन स्नाचिंग, पाकिटमारी यामध्ये बऱ्याच प्रमाणात याच मुलांचा समावेश असतो. त्यामुळे मुंबईची 'लाईफलाईन' समजल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वेला 'डेडलाईन' बनवणाऱ्या या स्टंटबाजांना आवरण्याची गरज आहे. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त