संसर्गजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी
संसर्गजन्य आजारांचा प्रसार होऊ नये यासाठी फूड डिलिव्हरी करणाऱ्या मुलांची आरोग्य तपासणी व्हायलाच पाहिजे. स्वीगी, झोमॅटो सारख्या कँपन्यांना एफडीएने त्यासाठी आदेश दिल्याने खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या इतर कँपन्यांदेखील ही बाब गांभीर्याने घेतील अशी आशा आहे. मात्र फूड डिलिव्हरी करणाऱ्यांपेक्षा ते बनवणाऱ्या कामगारांची आरोग्य तपासणी करणे अधिक गरजेचे आहे. आज शहरी भागांत कामाच्या व्यापामुळे बहुतांशी कुटुंबे अशा प्रकारे ऑनलाइन ऑर्डर देऊन खाद्यपदार्थ मागवणे पसंत करतात. मात्र हे अन्न कोठून येते, कशा परिस्थितीत व कोणत्या गुणवत्तेचे पदार्थ वापरून तयार केले जाते याबाबत त्यांना काहीही माहिती होत नाही. त्यामुळे केवळ डिलिव्हरी बॉईजची आरोग्य तपासणी करून उपयोगाचे नाही तर ते पदार्थ तयार करणाऱ्या कुकचीदेखील आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे. फूड डिलिव्हरी कँपन्यांनी आपल्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता टिकवण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी करणे सर्वांच्या हिताचे आहे.


Comments
Post a Comment