वाचनसंस्कृती जोपासणारे लग्नसमारंभ व्हावेत !
लग्नसमारंभात पुस्तके भेट देण्याचा पायंडा !
सध्या लग्नसराई अगदी जोमात सुरू आहे. एकीकडे उन्हाच्या काहिलीने घामाच्या धारा थांबण्याचे नाव घेत नसताना ग्रामीण व शहरी भागांत दररोज अनेक लग्ने उष्णतेच्या तडाख्यात पार पडताना दिसत आहेत. लग्नकार्यामध्ये नववर-वधूला काहीतरी भेटवस्तू किंवा आहेर देण्याचा प्रघात आहे. वर्षानुवर्षे ही प्रथा जवळपास सर्वच समाजात दृढ आहे. त्यांच्या भावी संसारास वऱ्हाडी मंडळींचा थोडा हातभार लागावा हा उद्देश यामागे आहे. कार्य विनासायास पार पडून यजमान कुटुंबास थोडा आर्थिक दिलासा मिळावा या उद्देशाने परस्परांना हा आहेर किंवा भेटवस्तू देण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र आजकालची परिस्थिती बऱ्याच अंशी बदललेली आहे असे आपल्याला दिसून येते. समाजाची सुधारत असलेली आर्थिक क्षमता व त्यामुळे लग्नकार्यातील भव्यता पाहता या प्रथेची फार गरज उरलेली नाही असे वाटते. अनेक लग्नांमध्ये तर या प्रथेला रीतसर फाटा दिला जातो. मात्र त्याऐवजी पुस्तके भेट देण्याचा नवा प्रयोग करायला हरकत नाही असे मला वाटते. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक जोडप्यांनी लग्नात गरजेच्या व शैक्षणिक वस्तू स्वीकारून त्या वस्तू गरीब गरजूंना वाटल्याची उदाहरणेदेखील आपल्यासमोर आहेत. आजच्या डिजिटल युगात लुप्त होत चाललेली वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी लग्नसमारंभात पुस्तके भेट म्हणून देण्याचा पायंडा पडण्यास काय हरकत आहे. मी देखील अशा अनेक लग्नसमारंभात भेटीसोबत नवदाम्पत्यास पुस्तक देण्याचा शिरस्ता पाळत आलेलो आहे. मागील रविवारी गावाकडे झालेल्या माझ्या संतोष नामक मित्राच्या लग्नात आहेरसोबत वाचनीय पुस्तकदेखील भेट रुपाने दिले जी कल्पना अनेकांना खूप आवडली. असाच प्रयोग गेल्या वर्षभरात झालेल्या अनेक लग्नकार्यात मी केलेला आहे. कुणाचा वाढदिवस असो, लग्न असो, सेवानिवृत्ती असो किंवा एखादे विशेष निमित्त असो प्रत्येक ठिकाणी मी त्यांना पुस्तक भेट देण्याचा प्रयत्न आवर्जून करतो. आजकालच्या तरुण पिढीला वाचनाकडे आकर्षित करण्याचे मोठे आव्हान आपल्या साहित्य जगताकडे आहे. शाळेत लागलेली वाचनाची आवड नंतरच्या काळात मात्र कामधंदे व संसाराच्या व्यापात टिकवणे अवघड झाले आहे. याचसाठी कोणत्याही कार्यक्रम उपक्रमात पुस्तके भेट देण्याचा प्रघात पडणे समाजहिताचे आहे. गेल्या वर्षी माझ्या गावात झालेल्या बालसंस्कार शिबिरात मी अशीच अनेक बोधपर व धार्मिक पुस्तके मुलांना वाटली होती. माझे मित्र व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जोगेश्वरीचे श्री गणेश हिरवे सरांनी देखील आपल्या आयुष्यात आजवर हजारो प्रबोधनपर पुस्तके भेट स्वरूपात अनेकांना दिली आहेत. त्यामुळे वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी लग्नकार्यात पुस्तके भेट देण्याचा पायंडा पडण्यास काय हरकत आहे?

Comments
Post a Comment