तंबाखुला नकार तर आरोग्याला होकार
जागतिक तंबाखू दिनाच्या निमित्ताने..
या महिन्यात ३१ मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जात आहे. या दिवशी शासकीय पातळीवर सर्व महाराष्ट्रातील जिल्हयांमध्ये विविध स्वरुपाचे जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. तंबाखूजन्य पदार्थांव्दारे होणारे धुम्रपान हा सध्याचा अत्यंत गंभीर विषय असून महाविदयालयीन तरुणांमध्ये त्याचे वाढते प्रमाण चिंतेची बाब आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्याला सर्वत्र दिसून येतात. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थांचे धुम्रपान करणा-या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पदार्थांच्या विक्री व सेवनावर अनेक निर्बंध आणुनदेखील अनेक ठिकाणी त्यांची विक्री खुलेआम होताना दिसते. तंबाखू सेवनाने भारतात साधारणतः १० लक्ष लोक विविध आजारांनी मृत्यू पावत आहेत. महाराष्ट्रामध्ये साधारणतः ३६ टक्के पुरुष व ५ टक्के महिला तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थांचा वापर करतात. तंबाखूमुळे ह़दयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफुसाचे आजार, टि.बी. यासारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात. पक्षाघात, मोतीबिंदू, नपुसंकत्व, कमी वजनाचे – व्यंग असलेले – मृत्यु पावलेले बाळ जन्माला येणे यासारख्या व्याधी जडतात. यामुळे लोकांमध्ये अकाली मत्युंचे प्रमाण वाढलेले आहे. देशात बीडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट, मावा, खैनी, मिसरी, चिलम यासारख्या तंबाखुच्या पदार्थांचे व्यसन सर्वाधिक केले जाते.

Comments
Post a Comment