Popular posts from this blog
डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर
By
vaibhavpatil
-
सलग दुसऱ्या वर्षी डॉ डी बी मार्ग पोलीस दवाखान्यामार्फत शिबिराचे आयोजन मंगळवार दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने डॉ. डी. बी. मार्ग पोलीस दवाखाना यांचेमार्फत डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ ते दुपारी २ या कालावधीत सदर शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरासाठी डॉ. हितेश पगारे यांच्या नेतृत्वाखालील जे. जे. रुग्णालयामधील राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या ब्लड बँकेच्या टीममधील डॉक्टर व त्यांचे सहकारी यांनी महत्त्वाची भुमिका राबविली. डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नितीन दळवी, पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत पाटील व त्यांचे सर्व सहकारी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आयोजनासाठी प्रत्यक्ष मदत करून सहकार्य केले. सदर शिबिराचे उदघाटन नागपाडा पोलीस रुग्णालयाचे पोलीस शल्य चिकित्सक डॉ. गजानन सानप यांचे हस्ते पार पडले. रक्तदानाचे सार्वजनिक जीवनातील महत्व विषद करून त्यांनी रक्तदात्याना मार्गदर्शन केले. सदर शिबिरात एकूण ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. उन्हाळ्यात नेहमीच रक्ताचा तुटवडा जाण...
देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा
By
vaibhavpatil
-
वारसा १०० वर्षांचा पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामधील देवघर हे गाव सार्वजनिक गणेशोत्सवाचे १००वे वर्ष यंदा साजरे करत आहे. गेल्या दोन पिढ्यांचा हा वारसा गावातील तरुण मंडळींनी अविरतपणे आजही सुरू ठेवला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात कै. महादेव राम पाटील यांनी सुरु केलेला एक गाव एक गणपती उत्सव आजही गावात मोठया उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यंदा गावातील हा गणेशोत्सव १०० वर्षे पूर्ण करत आहे. त्या निमित्ताने अत्यंत वास्तवदर्शी देखावा साकारण्यात आला असून त्यात गावातील घरे, शाळा, कॉलेज, मंदिरे यांसह गत १०० वर्षांत गावातील ज्या ठिकाणी हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला ती ठिकाणेदेखील ठळकपणे दर्शविण्यात आली. गावाशेजारील गुंज काटी येथील डोंगराच्या कुशीत वसलेले भगवान परशुरामांचे पांडवकालीन ऐतिहासिक मंदिरदेखील अत्यंत सुबकपणे देखाव्याच्या दर्शनी भागात दाखवण्यात आले. हा देखावा पाहण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत. मंदाकिनी पर्वताच्या कुशीत वसलेले १००० ते १२०० लोकवस्तीचे देवघर हे एक छोटेसे गाव असून गावात सर्व सण - उत्सव...
डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त
By
vaibhavpatil
-
सेवानिवृत्ती सन्मानाची डॉ. दुर्योधन गोपाजी चव्हाण, आरोग्य सेवेतील आणखी एक धुरंदर अधिकारी नियत वयोमानानुसार २७ वर्षे ३ महिने इतक्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. २६ फेब्रुवारी १९९८ रोजी आरोग्य सेवेत रुजू झालेल्या डॉ चव्हाण यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केले. वैद्यकीय अधिकारी, प्राआकेंद्र मंरूळपिर अकोला, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय मंरूळपिर, प्राआकेंद्र, कासोळा वाशिम, जिल्हा परिषद वाशिम, जिल्हा प्रशिक्षण पथक वाशिम, बलरामपूर उत्तर प्रदेश, धार मध्य प्रदेश येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून जिप वाशीम येथे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, सहाय्यक संचालक कुष्ठरोग तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून तसेच जिल्हा परिषद अकोला येथे माता बालसंगोपन अधिकारी, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, सहाय्यक संचालक हिवताप व हत्तीरोग म्हणून तसेच वर्धा व यवतमाळ येथे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून त्यांनी सेवा बजावलेली आहे. आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई येथे राज्यस्तरीय सहाय्यक संचालक मानसिक आरोग्य, आयुष, मुख्यालये व अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, तसेच उपसंचालक नर्सिंग व प्राआकेंद्र ह्...


Comments
Post a Comment