श्री पालांडे, श्री कांबळे, श्रीमती बनसोडे सेवानिवृत्त







आरोग्य सेवेतील आणखी तीन अधिकाऱ्यांनी सेवेतून काल एक्झिट घेतली. श्री प्रताप पालांडे, श्री दीपक कांबळे व श्रीमती नीलम बनसोडे हे अधिकारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. तिन्ही अधिकाऱ्यांचा आरोग्य सेवेत तीन दशकाहून अधिक असा प्रदीर्घ कालावधी लोटला. आज या सर्वांनी आरोग्य भवनात सहकुटुंब हजेरी लावत कार्यालयीन सेवानिवृत्ती स्वीकारली. कार्यालयातील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अगदी खेळीमेळीच्या वातावरणात त्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम पार पडला. त्यांचा याप्रसंगी सर्व अधिकारी कर्मचारी वर्गासाठी दुपारच्या भोजनाची व्यवस्था केली गेली होती तसेच आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांनी वर्गणीतून त्यांच्यासाठी भेटवस्तू आणल्या होत्या. हे तीनही वरिष्ठ कर्मचारी तसे आपापल्या जागेवर अत्यंत अभ्यासू, कर्तव्यतत्पर व हजरजबाबी म्हणून ओळखले जातात. इतर सहकर्मचाऱ्यांशी त्यांच्या सौहार्दपूर्ण वागण्यामुळे आज त्यांच्या सेवानिवृत्ती समारंभाप्रसंगी आरोग्य भवनातील ऑडिटोरिअम खचाखच भरले होते. अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांच्याबद्दल भरभरून मनोगते व्यक्त केली तसेच त्यांच्या सानिध्यात आलेले अनुभवदेखील शेअर केले. श्री प्रताप पालांडे हे माझ्या माहितीनुसार आरोग्य भवनमधील अत्यंत प्रामाणीक, कर्तव्यतत्पर व रोखठोक अधिकारी म्हणून ओळखले जातात. कर्मचारी संघटनेत तसेच कर्मचाऱ्यांच्या पतपेढीमध्येदेखील मोठी पदे त्यांनी भूषवली आहेत. यामुळेच त्यांच्यावर प्रेम करणारा मोठा कर्मचारीवर्ग आरोग्य भवनमध्ये आहे. त्याची प्रचिती आज आली. अगदी स्वच्छता कर्मचारीवर्गापासून मंत्रालय कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनी आज इथे धाव घेत त्यांना जाहीर शुभेच्छा दिल्या. श्री दीपक कांबळे यांचेशी माझा आमच्याच कक्षात प्रतिनियुक्तीवर असल्यामुळे अत्यंत जवळचा परिचय. गेले एक दीड वर्ष त्यांच्याबरोबर काम करताना त्यांची अभ्यासू, चिकित्सक परंतु सौम्य भूमिकेची वृत्ती प्रकर्षाने दिसून आली. आस्थापनेसारख्या महत्वाच्या विभागांमध्ये अधीक्षक म्हणून काम करताना त्यांचा संयमी व निरुपद्रवी स्वभाव सर्वांनीच अनुभवला. कामकाज करताना अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा व्हायच्या त्यामुळे एक चांगल्या मित्राचादेखील अनुभव त्यांच्या सानिध्यात घेता आला. त्यांनतर आजच्या तिसऱ्या सत्कारमूर्ती श्रीमती नीलम बनसोडे ह्या परिचारिका विभागात कार्यरत असल्यामुळे बऱ्याचदा त्यांचेशी कामकाजाच्या निमित्ताने संपर्क करावा लागायचा ज्यामध्ये त्यांचा सुस्वभाव व अभ्यासू वृत्ती पदोपदी निदर्शनास आली. वयाच्या अठ्ठावनव्या वर्षी सेवानिवृत्तीनंतरदेखील त्यांची शैक्षणिक करिअर घडवण्यातील आवड थक्कच करणारी आहे. वकिली क्षेत्रात पदवी मिळवलेल्या बनसोडे यांना वकिली क्षेत्रातच उच्च शिक्षण घेण्याची इच्छा आहे. त्यांचा एक मुलगा लंडन येथे स्थायिक झाल्याचे एकून खूप समाधान वाटले. त्यामुळे आज सेवानिवृत्त झालेल्या तीनही अधिकाऱ्यांच्या रिक्त होणाऱ्या जागांमुळे आरोग्य सेवेतील पोकळी अधिकच वाढत जाणार हे मात्र नक्कीच आहे. मीदेखील या सेवानिवृत्ती कार्यक्रमात थोडी उशिराने उपस्थिती लावत सवयीप्रमाणे तिन्ही अधिकाऱ्यांना पुस्तके भेट दिली. खरेतर शासकीय नोकरी हा एक प्रकारचा पिंजराच आहे. या पिंजऱ्यातून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी अनेक जण धडपडत असतात. आयुष्याच्या अठ्ठावनव्या वर्षापर्यंत निष्कलंक, प्रामाणिक व पदाला कुठलाही डाग न लागू देता सेवा बजावणे ही एक प्रकारची तारेवरची कसरतच असते व ती करण्यात श्री पालांडे, कांबळे व श्रीमती बनसोडे यशस्वी झाले त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांचे भावी आयुष्य आरोग्यदायी, सुखासमाधानाचे व कुटुंबकबिल्यातील प्रसन्न वातावरणात जावो ह्याच याप्रसंगी शुभेच्छा. 

वैभव

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त