शास्वत नैसर्गिक शेतीचा सक्षम पर्याय

लोकउद्धार फाउंडेशनचा उपक्रम


आजकाल शेतीमधून चांगले पीक येण्यासाठी व पिकांवर होणारा कुठल्याही प्रकारचा रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांकडून रासायनिक कीटकनाशके व खतांचा वापर करण्यात येतो. मात्र    शेतकरी वर्गाकडुन अजाणतेपणे अति प्रमाणात होणा-या रासायनीक खते कीटकनाशके फवारणीमुळे  मानवी जिवनात आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या रासायनिक किटकनाशकांमुळे कर्करोग, डायबिटीज, उच्च रक्तदाब यासारखे घातकी आजार बळावू शकतात. खरेतर 40 ते 50 वर्षांपूर्वी रासायनिक खते वापरण्याचे प्रमाण नगण्य होते तरीदेखील शेतकरी भरमसाठ उत्पन्न घ्यायचे. कीटकनाशके फवारणीचे पम्पही नव्हते म्हणजे तशी गरजच नसायची. पूर्वी गावात एक किंवा दोनच कीटकनाशके फवारणी पंप असायचे. मात्र आता ह्या रासायनिक कीटकनाशकांचा भडिमार पिकांवर केला जातो. कडक व क्षारयुक्त जमिनिमुळे पिकांवर रोगांचा व अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी उत्पन्न कमी झाले व शेतकरी कर्जबाजारी होऊ लागला आहे. शेती, पाणी, हवा, पर्यावरण यातील प्रदूषण दिवसेंदिवस वाढीस लागले आहे. त्यामुळे आरोग्य व जीवनमान बिघडत चालले आहे. यावर एकमेव उपाय म्हणजे शाश्वत नैसर्गीक  शेती. याविषयी शेतकरी वर्गामध्ये जनजागृती करण्यासाठी "लोक - ऊध्दार फाँऊडेशन, जळगाव" या संस्थेने पुढाकार घेतलेला आहे. शाश्वत नैसर्गिक शेतीबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी येत्या शनिवारी 25 मे 2019 रोजी त्यांनी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. शाश्वत नैसर्गिक शेती अभ्यासक श्री प्रकाश जगताप व अनुभवसंपन्न शेतकरी राधकीसन गुळवे यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना याप्रसंगी ऐकायला मिळणार आहे. श्री प्रकाश जगताप यांनी शाश्वत नैसर्गिक शेतीवर प्रचंड अभ्यास व चिंतन केले आहे. या तंत्राचा देशभरात व विदेशातही वापर केला जात आहे. त्यामुळे या माहितीचा फायदा आपल्या परिसरातील शेतकरी वर्गाला व्हावा यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. 25 मे रोजी संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत जि.प. मराठी शाळा, राम मंदीर जवळ, लोंणजे, ता. चाळीसगांव, जि. जळगाव या ठिकाणी आयोजित केलेल्या ह्या शेतकरी मेळाव्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे. अधिक माहितीसाठी श्री योगेश येवले ८३६९४११८७९ व श्री भरत पवार ९६८९०२८७७७ यांचेशी संपर्क साधावा.

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त