रॅगिंग एक विकृतीच


मुंबईच्या नायर रुग्णालयातील वसतिगृहात जळगावच्या पायल तडवी या प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीने रॅगिंगला कंटाळून नुकतीच आत्महत्या केल्याचा घडलेला प्रकार खूपच धक्कादायक आहे. कडक कायदे व रॅगिंगमुळे यापूर्वीही अनेकदा जीव जाण्याचे प्रकार घडल्याची उदाहरणे असताना आजदेखील महाविद्यालयांतील उच्च शिक्षित तरुणांमध्ये रॅगिंगचे प्रकार घडत असतील ती विकृतीच म्हणावी लागेल. ही विकृती मोडीत काढण्यासाठी आता शिक्षण संस्थानीच पावले उचलण्याची खरी गरज असून अशा घटनांवर देखरेख ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांचीच पथके बनवावी. ही पथके रॅगिंगच्या घटना प्रशासन व सुरक्षयंत्रणांकडे पोहोचवण्याचे काम करतील व रॅगिंगमुळे एखादी गंभीर घटणा घडण्याअगोदार त्यावर अंकुश आणता येईल. 

वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त