वास्तविकतेचे भान ठेवा


गेल्या अनेक महिन्यांपासून रेल्वे फलाटावरील छते बसवण्याची कामे जवळपास सर्वच उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये सुरू आहेत. ही कामे इतकी संथ गतीने सुरू आहेत की उन्हाळ्याच्या तीन चार महिन्यांमध्येदेखील रेल्वेला ती पुर्ण करता आलेली नाहीत. सोमवारच्या पावसाने तर या छताविना असलेल्या उघड्या फलाटांची दाणादाण उडवून दिली. रेल्वे स्थानकांमध्ये व सरकत्या जिन्यांमध्ये पाणी घुसल्याचे चित्र दिसत होते. आता रेल्वेला कदाचित जाग येईल व ही छते बसवण्याची कामे वेग पकडतील मात्र त्यासाठी आवश्यक दक्षता रेल्वे घेत नसल्याचे छत बसवताना झालेल्या एका कामगाराच्या मृत्यूने स्पष्ट झाले आहे. घाईघाईने करण्यात येत असलेल्या या कामांदरम्यान फलाटावर उभ्या असलेल्या एखाद्या प्रवाशाचा जीव गेला वा जखमी झाला तर त्याची जबाबदारी कुणाची? रेल्वेची की कंत्राटदाराची? वास्ताविकता प्रवाशांच्या जीवाशी खेळणारी ही कामे सुरक्षेच्या दृष्टीने गर्दीच्या वेळी न करता मध्यरात्रीनंतर केल्यास योग्य राहील असे मत आहे. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त