पालिकेचे स्वागतार्ह पाऊल
दरवर्षी पावसाळ्यात मुंबई तुंबण्याला सर्वात जबाबदार घटक कुठला असेल तर तो म्हणजे तुंबणारे नाले. नाल्यात टाकल्या जाणारा कचरा व प्लॅस्टिकमुळे नाल्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमताच आटून गेली आहे. तुंबणारे पाणी थेट नागरी वस्त्यांमध्ये जमा होते व त्याचा त्रास नागरिकांनाच सहन करावा लागतो. याच कारणामुळे अगदी थोड्या पावसातदेखील सखल भागांसह अनेक ठिकाणी पाणी साचते. त्यामुळे मुंबईतील नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांना थोपवण्यासाठी गस्ती पथके स्थापन करण्याचा पालिकेचा निर्णय योग्य वाटतो. अनेकदा जवळच्याच वसाहतींमधील, झोपडपट्टी भागांतील लोक कचरा टाकण्यासाठी सर्रास नाल्यांचा वापर करतात. यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने वर्षानुर्षांपासून नाल्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळेच नाल्यांना कचरामुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने उचललेले पाऊल स्वागतार्हच म्हणावे लागेल.

Comments
Post a Comment