महाराष्ट्रातील सर्व व्यवहार मराठीतून व्हावेत



महाराष्ट्राशेजारील राज्ये आपल्या भाषेचा कडवा पुरस्कार करत असताना महाराष्ट्रात मात्र मराठी भाषेला म्हणावा तितका सन्मान मिळत नाही ही शोकांतिका आहे. आज ग्रामीण व शहरी भागात मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे आणि त्यादेखील अखेरच्या घटका मोजत आहेत. आजच्या स्पर्धेच्या युगात राज्यातील नागरिकांनाही आपल्या पाल्यांसाठी पूर्णवळ मराठी माध्यम नकोसे झालेय. या पार्श्वभूमीवर राज्यात चालवल्या जाणाऱ्या सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी सक्तीसाठी कडक कायदे करावे लागत असतील तर तेदेखील महाराष्ट्र व मराठीचे दुर्दैवच म्हणावे लागेल. महाराष्ट्रात सर्वप्रथम सर्व सरकारी व खाजगी अस्थापनांवरील कामकाज मराठीत करावे लागेल. राज्यातील सर्व नोकऱ्यांमध्ये मराठी सक्ती अंगिकारावी लागेल. सर्व प्रकारचे व्यवहार मराठीत करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील तरच मराठीजनांचा ओढा पुन्हा एकदा मराठीकडे वळेल व राज्यात मराठीला सुगीचे दिवस येतील. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त