अडवली भुतावली शाळेत शालेय प्रवेशोत्सव
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र ४१,अडवली भुतावली या शाळेत दिनांक १७ जून २०१९ रोजी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला. स्वच्छ, सुंदर व उपक्रमशील असलेल्या अडवली भुतावली या शाळेने गेल्या दोन वर्षांत गावाबरोबरच नवी मुंबई महानगरपालिकेचे नाव महाराष्ट्रभर अनेक आदर्श उपक्रमाने गाजविले आहे. सालाबादप्रमाणे यंदाही मुलांचा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी नगरसेवक श्री रमेश डोळे, माजी नगरसेवक श्री चंद्रकांत पाटील, माजी नगरसेवक मुब्रा ठाणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री मोहनदादा डोळे, दानशूर आणि J A B S international कंपनीचे मालक श्री मेरुभाई चौहान, डाएट बदलापूर ठाणेच्या सौ सावंत मॅडम या मान्यवरांच्या हस्ते पहिलीच्या नवागत मुलांचे स्वागत करून पाठ्यपुस्तके खाऊ आणि फुले देऊन त्यांना गौरवण्यात आले. इ १ली ते ८वी च्या उपस्थित विद्याथ्यांना याप्रसंगी मान्यवारांच्या हस्ते पाठ्यपुस्तके वाटप केली गेली. श्री मेरुभाई चौहान यांनी 2000 वह्या शाळेच्या या पहिल्या दिवशी मुलांना वाटप केल्या. त्यांचे शाळेकडून मुख्याध्यापक श्री भिकाजी सावंत सर यांनी विशेष आभार मानले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक श्री नारायण पारधी, श्री महेंद्र भोये, श्री प्रवीण रोठे, श्री रविकांत शिवसरन, सौ विद्या पाटील, सौ कविता सरणींगे, सौ अस्विनी भोईर, सौ स्वप्ना पाटील,बालवाडी शिक्षिका सौ निर्मिती घोडविंदे आणि सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी मुलांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
वैभव पाटील
घणसोली
- Get link
- X
- Other Apps











Comments
Post a Comment