बेस्ट सेवा महानगरपालिकेने हाताळावी


देशाच्या सर्वात महत्वाच्या नगरीतील स्थानिक वाहतूक व्यवस्था हाकणाऱ्या बेस्ट परिवहन सेवेला गेल्या काही वर्षांपासून घरघर लागली आहे. मुंबईतील बहुसंख्य नागरिक आज वाहतुकीसाठी बेस्ट चा वापर करत असले तरी 'नाकापेक्षा मोती जड' या उक्तीप्रमाणे बेस्टचा देखभाल खर्च महामंडळाला परवडनेसा झालाय. याच कारणामुळे बेस्टसेवा तोट्यात जात असून कामगारांच्या वेतनावरूनदेखील प्रशासनाचे त्यांच्याशी खटके उडत आहेत. मुंबईच्या काही भागांतील तोट्यात चालणारे मार्ग व इंधनदरांत झालेली वाढ ही मुख्य कारणे यामागे आहेत. खड्डेजन्य रस्त्यांमुळेदेखील बस वारंवार नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत आहेत. बेस्टला पुन्हा सुगीचे दिवस आणायचे असतील तर ही सेवा पूर्णतः मुंबई महानगरपालिकेने हाताळावी किंवा तिचे खाजगीकरण तरी करून टाकावे. ह्या बसेस कुणीही चालवल्या तरी अखेर नागरिकांना एक चांगली व परवडणारी वाहतूक सेवा उपलब्ध होणे हेच उद्दिष्ट या सेवेमागचे आहे, नाही का? 

वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त