मोदींची वाटचाल राजकारण्यांना मार्गदर्शक
देशातील अनेक महत्त्वाच्या नेतेमंडळींच्या आयुष्यावर चित्रपट काढले जात आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर काढण्यात आलेला व विवेक ओबेरॉय यांनी अभिनय केलेला चित्रपट नरेंद्र मोदी यांचा जीवनपट जगासमोर उलगडवणारा आहे. आजवर मोदींबद्दलच्या अनेक खाजगी व राजकीय गोष्टी प्रसारमाध्यंमार्फत उजेडात आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्कंठता देशवासियांना होती जी या चित्रपटाच्या माध्यमातून काही अंशी संपलेली आहे. नरेंद्र मोदी यांचे आयुष्य मोठे संघर्षमय राहिले आहे आणि याच संघर्षातुन प्रेरणा घेत देशाचा मोठा राजकीय व सामाजिक घटक तसेच नागरिक त्यांच्या पाठीशी उभी आहे. त्यांचे व्हिजन अनेक वर्षे गुजरातला व आज देशाला मार्गदर्शक ठरत आहे. त्यामुळे नेता कसा असावा हे मोदींच्या आयुष्यावरील या चित्रपटातून पहावा असे वक्तव्य त्यांचीच भूमिका या चित्रपटातून वठवलेल्या विवेक ओबेरॉय यांनी केले तर त्यात वावगे अजिबात नाही. मोदींनी आपले राजकीय वर्चस्व व देशासाठी ठेवलेली उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने केलेली वाटचाल खरोखरंच राजकीय नेत्यांना मार्गदर्शक अशीच आहे.


Comments
Post a Comment