गर्दीवर नियंत्रण आणणार कसे
सुरक्षेचा उपाय म्हणून रेल्वे स्थानकांतील जाण्यायेण्याचे मार्ग कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जाण्याचे येण्याचे मार्ग म्हणजे प्रवेशद्वारे कमी केल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बराचसा फरक पडेल असे वाटते. कारण त्यामुळे सर्व प्रवाशांची तपासणी शक्य होणार आहे. मात्र मुंबईच्या रेल्वे स्थानकांवरील गर्दी पाहता वस्तुतः हे शक्य नाही. आज अनेक रेल्वे स्थानकांमध्ये अनेक प्रवेशद्वारे असल्याने चोहुबाजुनी प्रवाशांची गर्दी स्थानकांमध्ये प्रवेश करते. ही दारे कमी केल्याने प्रवाशांची तपासणी करणे सोपे होईल पण गर्दीवर नियंत्रण आणणार कसे? याचाही विचार व्हायला हवा. यापेक्षा स्थानकांतील फेरीवाले, गर्दुल्ले, विनातिकीट प्रवाशी कमी करण्यावर भर दिला पाहिजे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments
Post a Comment