नवी मुंबई महानगर पालिका शाळा क्र १०५ घणसोली शाळेत विद्यार्थ्यांचा जल्लोष
नवी मुंबई महानगर पालिका शाळा क्र १०५ घणसोली शाळेत विद्यार्थ्यांचा जल्लोष
दहावी निकालाची परंपरा कायम ठेवून या वर्षी ८०% निकाल..
घणसोली येथील नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक १०५ ने याही वर्षी दहावीच्या उत्तुंग निकालाची परंपरा कायम राखत शाळेचा ८०% निकाल लावला आहे. शाळेतील तब्बल २७० विद्यार्थी उत्तम गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. शाळेचा हा निकाल म्हणजे शाळेतील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी वर्षभर घेतलेल्या मेहनतीचे फळ मानले जाते. शाळा क्रं. १०५ मध्ये विद्यार्थ्यांकरिता सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात ज्यात मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडेही लक्ष दिले जाते. तसेच त्यांच्यातील विविध कलागुणांना वाव दिला जातो. शनिवारी लागलेल्या एसएससी निकालात ८०% निकाल लावत या शाळेने नवी मुंबईत महापालिका शाळांचा गौरव अबाधित राखला आहे. अतिशय गरीब तसेच काम करुन शिक्षण घेणारी मुले या शाळेत शिकत आहेत. हिंदी व मराठी माध्यम असे दोन्ही मध्यम या शाळेत चालतात. शिक्षक, विद्यार्थी व पालक या सर्वांच्या मेहनतीने शाळेचा निकाल ८० % लागला आहे तसेच जे विद्यार्थी अनुुतीर्ण झाले आहेत त्यांनीही खचून न जाता येणाऱ्या परीक्षेत खूप अभ्यास करून चांगले गुण मिळवावेत अशी अपेक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. ललिता मॅडम यांनी व्यक्त केली आहे. शाळेच्या या निकालाने महापालिका शैक्षणिक वर्तुळात तसेच घणसोली परिसरात शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
वैभव पाटील

Comments
Post a Comment