जेष्ठांवरील हल्ले चिंतेचा विषय
जेष्ठ नागरिकांच्या असहायतेचा फायदा घेऊन त्यांच्यावर हल्ले करण्याचे चिंताजनक प्रकार सातत्याने उघडकीस येत आहेत. पैसे व सोन्याची लूटमार हा मुख्य उद्देश या हल्ल्यांमागे असतो. पाश्चात्य विचारसरणीच्या आजच्या युगात विभक्त कुटुंबपद्धतीमुळे वृद्ध व्यक्तींना म्हणावे तसे स्थान व सुरक्षितता मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. यामुळे त्यांना संरक्षण उपलब्ध करून देण्यासाठी एकटे राहणाऱ्या वृद्ध व्यक्तींची माहिती स्थानिक पोलीस यंत्रणांकडे असावी. जोखमीच्या, संकटाच्या व आपत्कालीन वेळी त्यांचा जलद संपर्क जवळच्या पोलीस ठाण्याशी होण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. त्या दृष्टीने वृद्धांना समुपदेशनाने प्रशक्षित करावे. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक काळजी घेतली तरच वृद्धांवरील हल्ले थांबतील व हे हल्ले करणाऱ्या ठराविक टोळ्यादेखील पकडल्या जातील.


Comments
Post a Comment